∆ प्रतिनिधी /माली पाटील
काँग्रेस तथा ओबीसी नेते नामदेव आयलवाड यांच्या तर्फे माजी केंद्रीय मंत्री कै.डाॅ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त गोर गरीब, शेतकरी यांना छत्र्याचे वाटप करण्यात आले आहे.तसेच काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित निवड झालेल्या पदाधिकारी यांचे ही यावेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
ओबीसी नेते नामदेव आयलवाड यांच्या उमरी रोडवरील, संपर्क कार्यालयात रविवार दिनांक २३ जुलै रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी भोकर ता.काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष भगवान दंडवे , युवक अध्यक्ष अत्रीक मुंगल ,ओबीसी संघटनेचे ता.अध्यक्ष मोहन राठोड, व्ही.जे.एन.टी. समाजाचे अध्यक्ष अवधुत गिरी,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गोदेवाड यांचाही आयलवाड यांनी शाल पुष्पहार देवून सत्कार केला. यावेळी मा. जि.प.चे कृषी सभापती बाळासाहेब रावगावकर, बाजार समितीचे सभापती जगदीश पा भोसीकर,सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधव अमृतवाड, गोविंद बाबा गौड,नवनिर्वाचित अध्यक्ष भगवान दंडवे आदींनी भोकर मतदारसंघात काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून पुन्हा महाराष्ट्र राज्याची सुत्रे अशोकराव चव्हाण यांच्या हाती देण्यासाठी भोकर, मुदखेड,अर्धापूर या तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष बळकट करून सर्व सता केंद्रे जिंकण्याचा निर्धार केला. यावेळी माजी सभापती गोपतवाड, माजी नगराध्यक्ष विनोद पा. चिंचाळकर, शहराध्यक्ष खाजु इनामदार,बाबुराव पाटील आंदबोरीकर, सना इनामदार, सुवेश पोकलवार, सिध्देश्वर पिटलेवाड,शिवसेनेचे अँड. परमेश्वर पांचाळ, सुभाषराव नाईक, विठ्ठल माचनवार, ,विक्रम क्षिरसागर, पांडुरंग पपुलवाड, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष बालाजी येलपे, सोशल मीडियाचे संजय चिंतावार,डौरचे सरपंच प्रतिनिधी विष्णू दंडेवाड, संतोष अनेराये,सुनील मादनवाड,राजू बुलबुले, आदिची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अंबादास अटपलवार यांनी केले.ओबीसी नेते नामदेव आयवाड यांनी नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन गरजू गरीब शेतकरी व भाजीपाला विक्रेते यांना कै.शंकरराव चव्हाण जयंती निमित्त छत्र्याचे वाटप केले.