लो क भा व ना न्यु
प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
भोकर दि.२३ - भोकर तालुक्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी व बे दखल पणामुळे मौजे रेणापुर येथील सुधा प्रकल्पाचा उजवा कालवा फुटुन शेती व शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणा त नुकसान झाले असून हे फुटलेले नादुरुस्त कालवे दुरुस्त करून देण्याची मागणी गट नं.२० मधील शेतकर्यांनी शासनाकडे मागणी केली आहे.
या बाबत असे की, भोकर तालुक्यातील मौजे रेणापुर येथे बालाजी बाबळे व बाबळे कुटुंबाची गट नं २० मध्ये शेती आहे. या शेतीच्या पश्चिमेला शिव पांदन रस्ता आहे.या रस्त्याच्या तोंडावरच उलट पाईप टाकून कालवा बंद केला.याचे पाणी शिवपांदन रस्त्यावरुन वाहत आहे. हा पांदन रस्ता करण्यास शासन टाळाटाळ करीत आहे.तसेच या ठिकाणी सुधा प्रकल्पाचे डावा आणि उजवा कालवा आहे. या कालव्याचे शेतकऱ्यांना कसलाच फायदा नाही.काहीनी उजवा कालवा जाणुन बुजुन फोडुन टाकला यामुळे पावसाळ्यात या पाण्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शासनाने याबाबत तक्रार केली असता नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे केले.पण याकडे कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत.शेतात उभी असलेली पिके वाहून गेले मग शेतकरी जगावे तरी कशे ! असा संतप्त सवाल शेतकरी बालाजी बाबळे यांनी केली आहे.शासनाकडे वारंवार निवेदने देऊन ही शासनातील कर्मचाऱ्यांचे सतत दुर्लक्ष होत असुन शेतीची पिके तर वाहुन गेलीच पण शेती सध्या नापीक झाली आहे.त्यामुळे लघुपाटबंधारे विभागाने सध्या उजवा कालवा मातीने भरणा झाला असल्याने यातील पाणी पुढे जात नसल्याने ते दुरुस्त करून फोडलेल्या ठिकाणी कालवा बांध टाकीन दुरुस्त करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी लघुपाटबंधारे विभागाकडे शेतकरी बालाजी बाबळे यांनी केली आहे.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अगर लघुपाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष केल्यास कायद्याने लढा देऊन कुचकामी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्या बाबत विचार चालू असल्याचे शेतकरी बालाजी बाबळे यांनी सांगितले.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••