∆ लो क भा व ना न्यु ज ∆
प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
भोकर तालुक्यात नव्याने सुरू होणारी समर्थ अर्बन को- ऑपरेटिव्ह सोसायटी ही सभासदाची ठेवी सुरक्षित ठेवून सभासदाचा समतोल राखत पारदर्शक कारभार करेल त्यामुळे भोकर तालुक्यातील अधिका अधिक सभासदांनी शेअर्स नोंदणी करून सहकार्य करावे व या क्षेत्रात राजकीय कसलाच वास येऊ देणार नसुन चहा सुध्दा पिणार नाही आणि सभासदांचा विश्वासघात करणार नाही अशी ग्वाही बँकेचे मुख्य प्रवर्तक बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी दिली आहे.
भोकर शहरातील दत्तगडावर दि.२० ऑगष्ट रोजी नागपंचमी व श्रावण सोमवारच्या शुभ मुहूर्तावर समर्थ अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, भोकर बँकेच्या शेअर्स विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रावणगावकर बोलत होते. भोकर तालुक्यातुन राजकारण करत असताना सहकार क्षेत्रात रावनगावकराचे पाऊल वळले. अन् शेअर खरेदी शुभारंभ ही केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ मंगाराणी अंबुलगेकर ह्या होत्या. दत्तगडाचे महंत उत्तम बन महाराज यांच्या हस्ते शेअर्स विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सभापती जगदीश पाटील भोसीकर, माजी जि.प. सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर, काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष भगवान दंडवे, मा पं समिती सभापती गोविंद पाटील गौड, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, उप सभापती बालाजी सानपवाड, भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोर पाटील, संचालक सुभाष पाटील किन्हाळकर संचालक रामचंद्र मुसळे, संचालक गणेश पाटील कापसे, सरपंच संघटनेचे माधव अमृतवाड, माजी उपसभापती सूर्यकांत बिलेवाड,शिवसेनेचे सुभाष नाईक किनीकर,साहेबराव पाटील भोंबे, गणेश राठोड, सेनेचे उप जिल्हा प्रमुख सतीष देशमुख,सुभाष पा.कोळगावकर, मोहन पाटील हसापूरकर, केशव पाटील पोमनाळकर, व्यंकटराव जाधव, शामसुंदर कदम, माधवराव पोमनाळकर, राजकुमार अंगारवाड, राम नाईक, सय्यद खलील,प्रताप पाटील महागावकर,सेनेचे रमेश महागा वकर, गंपू पाटील, सुलोचना ढोले, सुरेखा काळे,राजु पाटील, विनोद चव्हाण आदींची उपस्थिती होती.यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.यात प्रकाश भोसीकर यांनी आपली गावरान भाषेत भाषन करत त्यांनी सभा स्थळ हस्याकल्लोळत ठेवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मनोज गिमेकर यांनी तर आभार अँड. शिवाजी कदम यांनी मानले. यावेळी रावसाहेब लामकानीकर, आनंद ढवळे, मारोतराव पा. भोंबे, शेख बशीर, अंबादास जाधव यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.