भोकर येथील मोंढा मैदानात दहीहंडी महोत्सव उत्साहात साजरा



         प्रतिनिधी / माली पाटील किनीकर 

भोकर येथील मोंठा मैदानात संघर्ष युवा प्रतिष्ठान तथा सेनेचे राहुल पाटील कोंडलवाड मित्र मंडळाच्या वतीने आयोजित भव्य दहिहंडी सोहळा मोठ्या उत्सवात संपन्न झाला असून या दहिहंडीचे मानकरी नांदेड येथील टीम ठरली आहे.                                           

       गोकुळ अष्टमीचे औचित्य साधुन  दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही सेनेचे राहुल पाटील कोंडलवाड यांनी संघर्ष युवा प्रतिष्ठान व मित्र मंडळाच्या वतीने दि.१८ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ठिक ८ वाजता दहीहंडी उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बबनराव बारशे हे होते.त्यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून दहीहंडी उत्सवास प्रारंभ करण्यात आला.यावेळी डिजेच्या तालावर तरुणाई नाचत आनंद लुटत होती.या कार्यक्रमास भोकर शहरातील तरुण मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुदखेड शहर प्रमुख सचिन चंद्रे, अर्धापूर शहरप्रमुख अल्लादिन काजी, हदगाव हिमायतनगर व भोकर विधानसभा जिल्हा समन्वयक अँड.परमेश्वर पांचाळ, तालुका संघटक संतोष आलेवाड, शहरप्रमुख पांडुरंग वर्षेवार, जेष्ठ शिवसैनिक सुभाष नाईक किनीकर, चेअरमन साहेबराव पाटील भोंबे,माजी तालुकाप्रमुख प्रमुख प्रदीप पा. दौलतदार,युवा सेना उप जिल्हा प्रमुख माधव करेवाड, संतोष पाटील कदम,पिंटु सानप,माजी संघटक सुनील पाटील जाधव, किनी सर्कल प्रमुख रमेश महागावकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष उत्तम कसबे, विशाल बुध्देवाड,श्याम वाघमारे, पांडुरंग कटकमवाड,खडकीचे सरपंच पाटील,अशोकरेड्डी किनीकर,उप तालुका प्रमुख सुर्यकांत पिंगलवाड आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी दहीहंडी फोडण्याचा मान नांदेड घ्या पथकाने पटकाविला आहे.हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघर्ष युवा प्रतिष्ठानचे राहुल कोंडलवार, युवा सेनेचे शहर प्रमुख कृष्णा कोंडलवार व मित्रमंडळी प्रयत्न केले.



Post a Comment

Previous Post Next Post