भोकर येथील राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक पदी शुभम गड्डापुरे तर मुंबई पोलीस मध्ये अमोल सुर्यवंशी यांची निवड झाल्याने अशोक काॅलनीत सत्कार

              प्रतिनिधी / माली पाटील 

भोकर येथील असलेले शुभम गड्डापुरे यांनी एमपीएससी परीक्षेत यशस्वी घोडदौड करत राज्य उत्पादन शुल्क विभागात 'उपनिरीक्षक' म्हणून तर येथीलच अमोल सुर्यवंशी या युवकाचे 'मुंबई पोलीस' म्हणून नेमणूक झाल्याने भोकर शहरातील अशोक काॅलनी  मधील नागरिक व मित्रमंडळाकडून कौतुकाची थाप म्हणून दोघांचा येथोचित सन्मान कार्यक्रम संपन्न झाला आहे.

भोकर तालुक्यातील मौजे बेंबर येथील रहिवासी परंतु भोकर येथेच राहणारा शुभम भरतराव गड्डापुरे यांने एमपीएससी परीक्षेत यश संपादन करुन  राज्य उत्पादन शुल्क विभागात उप निरीक्षक म्हणून निवड झाल्याने व सोबतच मुंबई पोलीस मध्ये अमोल गणपतराव सूर्यवंशी याची निवड झाल्याने दि.२३ सप्टेंबर २०२३  रोज शनिवारी या दोघांचाही अशोक नगर कॉलनीत "कौतुकाची थाप" म्हणून भव्य सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करुन भोकरच नाव करणार्या शुभम गड्डापुरे व अमोल सूर्यवंशी यांचा अशोक नगर मधील रहिवाशां कडुन औक्षवंत करत  त्यांच्यावर कौतुकाची थाप मारली.त्या नंतर त्यांचा शाल,श्रीफळ व हार,तुरे घालून हृदयपूर्वक सन्मान केला आहे. यावेळी आपल्या जीवनात यशस्वी यश संपादन करणाऱ्या या भूमिपुत्रांचा गौरव व कौतुकाची थाप देण्यासाठी नामदेवराव कोटुरवार, पुरुषोत्तमजी मेहता, माधवराव बेंबरकर, रंगराव घंटलवार, बाबाराव जाधव, शिवसेनेचे अँड. परमेश्वर पांचाळ, प्रदीप दौलतदार, सुभाष नाईक किनीकर, साहेबराव पाटील भोंबे, पांडुरंग वर्षेवार. विजय किनीकर, पत्रकार अनिल डोईफोडे, पत्रकार उत्तम कसबे, आनंद चिठ्ठे, माधव तगडपल्लेवार, लोणे साहेब शरद देशमाने, संतोषदादा कोटुरवार,संतोषशेठ मेहता, विकास भारती, शेखर कुंटे सरसमकर, राजू कवडे, योगेश चल्लावार, गजानन सूर्यवंशी, चेतन पारटकर, अजय कोंडेकर, तेजस खांडरे, ऋषिकेश, ओंकार पोकलवार, मारुती बुट्टनवाड यांची उपस्थिती होती.   

हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक कॉलनीचे संतोष कोटुरवार, स्वप्निल रेड्डी, मयूर जोशी, साई होणे, यश कोटुरवार, अशितोष जाधव आदींनी परिश्रम घेतले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post