प्रतिनिधी / माली पाटील
हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकांबा येथील महिला शांताबाई पुंजाराम खंदारे वय ५० वर्षे ही महिला शेतात काम करण्यासाठी गेली होती. दुपार झाली अन आकाशात आभाळ काळेकूट दाटून आले आणि लागली जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस येत असल्याने निघण्याच्या आतच विजेचा कडकडाट होऊन विज मयत शांताबाई खंदारे यांच्यावर कोसळली. व ती महिला जागीच ठार झाली. त्यामुळे शांताबाई या महिलेवर वीज पडून तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा. घडली असून यामुळे गावात शोककळा पसरली आहे.