प्रतिनिधी / माली पाटील
भोकर - भोकर तालुक्यात पावसाचा व नंतर गर्मीच्या वातावरणामुळे आरोग्यात मोठी बिघाड होऊन सध्या डेंगू, थंडी, ताप, मलेरिया व खोकला अशा आजाराने नागरिक त्रस्त असून या वाढत्या आजारास प्रतिबंध करण्यासाठी व मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी तालुक्यातील खेडेगावात व शहरात जंतुनाशक फवारणी करावी अशी मागणी नागरिका कडून करण्यात येत आहे.
भोकर तालुक्यात व शहरात अनेक दिवसापासून डासांचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत असून जागोजागी डासांचा जथ्था दिसून येत आहे. याच डासांच्या प्रादुर्भावाने शहर व खेडेगावात डेंगू, थंडी, ताप, अंग दुखी व खोकला हे आजार उद्भवले असून यात पाऊस व नंतर गर्मीच्या परिणामाने आरोग्यावर त्याचा मोठा परिणाम झाला असून यामुळे अनेक रोगांनी थैमान घातले आहे. यात नागरिकांनी सरकारी दवाखाना व खाजगी दवाखान्यात गर्दी करताना दिसून येत आहेत. सध्या खोकला, ताप, मलेरिया, डेंगू, सर्दी आधी आजाराने नागरिक त्रस्त झाले असून यामुळे शासनाने प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत जंतुनाशक फवारणी करावी तर भोकर शहरातही मोठ्या प्रमाणावर डासांचा उपद्रव्य झाला असून नगरपरिषदेने याकडे लक्ष देऊन जंतुनाशक फवारणी करून होणाऱ्या रोगराई पासून दूर करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात घाणीचे साम्राज्य; शिवसैनीक गंगाधर तुराटीकर यांच्या निवेदना आधीच डाॅक्टरानी केली साफसफाई