भोकर / माली पाटील
भोकर दि. ३- तालुक्यातील मौजे जामदरी( टेकडी ) येथे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथीचे ऐच्छिथे साधून महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना महाराष्ट्र मिलेट सन २०२३-२४ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण व सार्वभौम ग्रामसभेचे आयोजन कृषी विभाग व गुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाघाटक म्हणून नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत तर
अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्षीक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे होते.प्रमुख पाहुणे म्हणून आत्माचे संचालक अनिल गवळी होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर संदीप जायभाये तसेच संदीप डाकुलगे व श्री भूमाजी टेकाळे हे होते.
कार्यक्रमाच्या प्रथम प्रसंगी मोजे जामदरी येथील वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या अस्ति समाधीस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपस्थित ग्रामस्थ व शेतकऱ्यांना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे अनमोल असे विचार व शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन काढण्या साठी रासायनिक खत व कीटकनाशकांचा वापर कमी करून सेंद्रिय व जैविक शेती करण्याविषयी मार्गदर्शन केले.जिल्हा कृषी अधीक्षक बराटे यांनी सर्व सार्वभौम ग्रामसभा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.तेव्हा गावातील महिलानी आमच्या गावातील दारू बंदी विषयी प्रथम ग्रामसभेमध्ये पहिला ठराव आपल्या उपस्थित मंजूर करावा ही या सर्व गावकऱ्यांसमवेत शेतकऱ्यासमवेत या कार्यक्रमात मागणी केली. याच आपल्या गावातील अडीअडचणी सोडवण्यासाठी सार्वभौम ग्रामसभेचा मुख्य उद्देश असल्याचे श्री बराटे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
यानंतर कृषी विज्ञान केंद्र पोखरणी येथील श्री संदीप जायभाये यांनी रब्बी हंगाम पिक विषय तसेच पिकाच्या वाण निवडी पासून ते खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कीड व रोग नियंत्रण व्यवस्थांना बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.त्यानंतर प्रकल्प संचालक आत्मा श्री अनिल गवळी यांनी आपल्या मनोगतात आधुनिक काळातील शेती पुढील आव्हाने तसेच डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अंतर्गत शेतकरी गट व कंपनी स्थापन करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व महाराष्ट्र शासनाचा पुढील काळात १३ लाख पेक्षा अधिक क्षेत्र हे सेंद्रिय शेती खाली आणण्यासाठी आपला मानस असून आपल्या माध्यमातून पुढील कालावधीत पूर्ण करण्याचे आवाहन.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले.
यावेळी तहसीलदार राजेश लांडगे, भोकर तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, चेअरमन, प्रतिष्ठित नागरिक, शेतीनिष्ठ आदर्श शेतकरी, तालुका कृषी अधिकारी, सर्व मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.