पाकी
प्रतिनिधी / माली पाटील
भोकर दि. ६ - नुकताच उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून भोकर तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी यांची निवड जाहीर झाल्याने मौजे किनी व मौजे पाकी या गावी शिवसैनिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा किनी व पाकी येथे दि. ५ ऑक्टोबर रोजी रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शिवसैनिकांच्या वतीने पाकी येथे जगदंबा मंदीरात जिल्हा समन्वयक अँड.परमेश्वर पांचाळ, जिल्हा उ संघटक सुभाष नाईक किनीकर (माली पाटील), तालुका प्रमुख संतोष आलेवाड,शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार पाकी येथील जगदंबा मंदीरात करण्यात आला यावेळी शाल श्रीफळ देऊन शिवसैनिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी सिद्राम राठोड, लक्ष्मण पवार,ग्रा.पं.सदस्य नविनरेड्डी मंथेनवाड,ग्रा.प. सदस्य रामलु राठोड,सिताराम राठोड आदींसह नागरीक उपस्थित होते.
ममौजे किनी येथील शिवसेनेच्या वतीने सन्मान. ..
मौजे किनी येथे शिव सेनेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मोठ्या उत्साहात सत्कार शिवसैनिकांनी केला. किनी येथील विश्वधाम ज्ञानपिठ कार्यालयात सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत अधिकारी गणपतराव पांडलवार हे होते. यावेळी शिवसैनिकांच्या वतीने निवड झालेल्या पदाधिकारी अँड.परमेश्वर पांचाळ, सुभाष नाईक किनीकर, संतोष आलेवाड, पांडुरंग वर्षेवार व सोबत असलेले विशाल बुध्देवाड, पांडुरंग कटकमवाड यांचा भगवी दस्ती,हार घालून सन्मान करण्यात आला आहे.या प्रसंगी अँड.पाचाळ, संतोष आलेवाड, पांडुरंग वर्षेवार यांची भाषणे झाली.गणपतराव पांडलवाड यांनी अध्यक्षीय समारोप केले.यावेळी जेष्ठ शिवसैनिक लक्ष्मणदादा कोरडे, नरेशरेड्डी सल्लावाड, गंगाधर तुराटीकर, सायारेड्डी प्रेमयगार, गणेश आटाळकर, सायारेड्डी मुस्कुवाड,माजी ग्रा.पं.सदस्य नागनाथ लोलपवाड, व्यंकटरेड्डी दोडीकिंदवाड, परमेश्वर दांडेकर,लालेश कुम्मरवाड,श्रीधररेड्डी,शंकर अंकमवार भोजराज दातवणे,बासनुरे आदी शिवसैनीक हजर होते.