प्रतिनिधी /माली पाटील
नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर जाहीर करण्यात आली असून यात शिवसेनेचे जेष्ठ शिवसैनिक सुभाष नाईक किनीकर यांची नांदेड उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा उपसंघटक पदी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नांदेड जिल्हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नुतन कार्यकारिणी दि.२६ ऑक्टोबर २०२३ रोजी सामना या वृत्तपत्रातुन जाहीर करण्यात आली आहे.यात भोकरचे अँड.परमेश्वर पांचाळ जिल्हा समन्वयक व जिल्हा उप समन्वयक म्हणून माधव पाटील वडगावकर तर तालुका प्रमुख म्हणून संतोष आलेवाड, तालुका संघटक नंदु पाटील कौठेकर,शहर संघटक म्हणून राहुल कोंडलवार यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.तर गत अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेच काम करणारे सर्व सामान्याचे नेतृत्व असलेले सुभाष नाईक किनीकर (माली पाटील) यांची ३५ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा संघटक म्हणून निवड केली आहे. शिवसेनेत सन१९८७ पासुन वयाच्या १७ व्या वर्षांपासून शिवसेनेच काम करतात.पण पक्ष त्यांना अनेक वेळा निवडणूक असो की,पद देणे असो टाळले गेले होते.सुभाष नाईक यांच काम व कार्य हे जनता जाणुन आहे.पण पक्षाने मात्र कधी विचारच केला नाही.अशा वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बबन बारशे यांनी मात्र निष्ठावंत शिवसैनिक म्हणून बाजु घेत सुभाष नाईक यांना पद देण्यासाठी पक्षाकडे शिफारस केली आहे.तेव्हा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख बबनराव बारशे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा कार्यकारिणी जाहीर करत जिल्हा उप-संघटक म्हणून जेष्ठ शिवसैनिक सुभाष नाईक किनीकर यांची निवड निवड केली असल्याने खर्या शिवसैनिकांना न्याय दिल्याने सर्व सामान्य शिवसैनीकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.या निवडीचे स्वागत जेष्ठ नेते तथा चेअरमन साहेबराव पाटील भोंबे,शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार,माजी जि.प.सुनील चव्हाण, रमेश महागावकर, साईनाथ गादेपवाड, संजय चिकटे, साहेब वाकोडे,मारोती पवार मुन्ना पाटील, वसंत जाधव,रामा भालेराव, पुंडलिक भोसले, गणेश आरलवाड,आनंद लोमटे,माधव करेवाड, लक्ष्मण ईरलोड, नरेशरेड्डी सल्लावाड, गंगाधर तुराटीकर, सायारेड्डी प्रेमयगार, नागनाथ लोलपवाड, सायारेड्डी मुस्कुवाड, साईनाथ आरलवाड, श्रीकांत सातमवार, भुजंग राठोड, गजानन हाके,शंकर आरलवाड, दत्ताहरी पाटील आदी केले आहे.