दिवाळी तोंडावर तरी ना अनुदान ना अग्रीम पिक विमा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार - शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

 

                प्रतिनिधी / माली पाटील 

भोकर दि.७- राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे  शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष होत असुन दिवाळी तोंडावर असताना सुद्धा अजुन नुकसान झालेल्या शेतीचे अनुदान व २५ टक्के पिक विमा अग्रीम बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले नसल्याने दिवाळी अंधारात जाणार असल्याचे दिसून येत असल्याने शासनाने येत्या दोन ते तीन दिवसांत अनुदान व विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा उप- संघटक सुभाष नाईक किनीकर यांनी सरकारला दिला आहे.

   या वर्षी पाऊस सुरवातीला मोठा प्रमाणावर झाला नंतर ऐन पिक ऐरणीवर असताना जवळपास एक महिना गायब झाला यामुळे पिकांची स्थिती दोलणामयक झाली.अन सोयाबीन व कापूसाच्या उतार्यात मोठी घट झाली.लावलेले बि-बियाणे,महागडी औषधी टाकले गेले.पण जेंव्हा पिक काढले तेंव्हा यातुन केलेला खर्च निघाला नाही.आणि यातच भाव सुद्धा ही कवडीमोल यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.शेतकर्याचे एवढे मोठे नुकसान नुकसान असताना पिक विमा कंपन्या मात्र नरो वा कुंजोच्या भुमीकेत आहे. २१ दिवस पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांना २५ टक्के पिक विमा अग्रीम बोनस म्हणून देणं बंधनकारक असताना याकडे डोळेझाक होत आहे.त्यामुळे शिवसेना व इतर पक्षांनी शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम बोनस द्या म्हणून निवेदने देण्यात आली होती.तेव्हा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बोनस देण्याविषयी आदेश करुन ही पिकं विमा कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.यातच शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करुन ही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकले नाही.दसरा गेला अन् आता दिवाळी तोंडावर असताना अजून ही पैसे खात्यात टाकले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्या अगोदर येत्या दोन ते तीन दिवसांत अनुदान खात्यावर न टाकल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा उप संघटक  सुभाष नाईक किनीकर यांनी सरकारला दिला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post