राजकीय पक्षाने दिलेल पद म्हणजे केलेल्या कार्याची पावती होय- यशवंत सेना नेते नागोराव शेंडगे बापू



                  प्रतिनिधी / माली पाटील 

भोकर दि.८ - राजकीय पक्षाने दिलेल पद म्हणजे आपण केलेल्या कामाच्या निष्ठेच फळ असुन हिच कार्याची पावती असल्याचे मत यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख नागोराव शेंडगे बापू यांनी तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने सत्कार कार्यक्रमाच्या वेळी भोकर येथे बोलताना केले.

 भोकर येथील भोकर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ली येथील कार्यालयात भारतीय जनता पार्टी ओबीसी जिल्हा चिटणीस म्हणून जेष्ठ नेते हरीभाऊ हाके पाटील  तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा उप-संघटक पदी सुभाष नाईक किनीकर यांची निवड झाल्याने भोकर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख नागोराव शेंडगे बापू हे होते. यावेळी हरीदत्त हाके पाटील व सुभाष नाईक किनीकर यांचा समाजाच्या वतीने फेटा,शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.यावेळी अध्यक्षीय समारोप करताना शेंडगे बापू म्हणाले की,समाजाचे जेष्ठ नेते हरीभाऊ हाके पाटील यांनी आपल्या कारकीर्दीत ग्राम पंचायत अनेक वर्ष ताब्यात ठेवली त्यांनी अनेक विधायक कामे केली. त्यामुळे पक्षाने त्यांची तालुका अध्यक्ष पदावरून जिल्हा चिटणीस पदावर बढती केली हिच त्यांच्या कार्याची पावती आहे. वयाच्या १७ व्या वर्षांपासून शिवसेना पक्षाची धुरा सांभाळत किनी सर्कल शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून उदयास आणले तालुक्यातील मोठे गाव असलेले किनी गावातील ग्राम पंचायत ताब्यात घेऊन शिवसैनिकांच्या साथीने भगवा फडकवला. शिवसेनेशी एकनिष्ठ राहत रंजल्या,गांजलेल्या गोर गरीब जनतेची कामे केली व करत राहतात म्हणून सुभाष नाईक म्हणजे रस्त्यावरच्या सर्व सामान्याचा कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाते.त्यांना पक्षाने अनेकवेळा अन्याय केले तरी ते पक्षासोबत राहिले अन् आज कुठे तरी पक्षाला त्यांच्या कामाची दखल घ्यावी लागली व जिल्हा उप संघटक म्हणून निवड केली. हे त्यांच्या आतापर्यंत केलेल्या कार्याचे फळ असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी सर्जेराव शिंदे, राजेश हाके पाटील,भोकर रुरल फार्मर्स कंपनीचे अध्यक्ष माधव पाटील सलगरे, निलेश चिकाळकर, खंडू गोरे, लाला कोकणे, दत्ता कांगटे, गोविंद लिंबेकर बालाजी परडे, विलास शेळके, साहेबराव पाटील भोंबे, रमेश पाटील,प्रेस संपादकचे ता.अध्यक्ष उत्तम कसबे, मारोती भालेराव,तेजस मलदोडे, अवधूत हाके पाटील, गंगाधर कोरडेवाड,चांदु बासनुरे, लक्ष्मण गाणलावाड सह अनेक बांधव उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post