प्रतिनिधी /माली पाटील
भोकर-दि. १० - पिक विमा कंपन्या २५ टक्के अग्रीम बोनस देण्यास टाळाटाळ करीत होती पण शासनातील कषी विभाग व जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नामुळे अखेर पिक विमा (२५ टक्के) मंजूर झाला असून भोकर तालुक्याला २४ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात न जाऊ देता पिक विमा व नुकसानग्रस्त निधी चार दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर न टाकल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना संघटक सुभाष नाईक किनीकर यांनी सरकारला दिला होता.अखेर शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला असुन शेतकऱ्यांनी किमान दिवाळी गोड साजरी करावी पण अजुनही अतिवृष्टी नुकसान निधी खात्यावर महसुल प्रशासन टाकले नाही तो ही निधी त्वरित जमा करावा जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
अशोक निळकंठे यांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सत्कार संपन्न
भोकर - शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर वृत्तपत्रा च्या माध्यमातून पत्रकार म्हणून समाज सेवेची आवड उराशी बाळगून या क्षेत्रात पदार्पण करणारे अशोक निळकंठे यांची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भोकर या संघटनेत सामील होऊन त्यांना ' तालुका संघटक' म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.या वेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा समन्वयक अँड. परमेश्वर पांचाळ हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून साहेबराव पाटील भोंबे, गणेश आरलवाड, सुर्यवंशी, सचिव सुभाष नाईक किनीकर हे होते.यावेळी अशोक निळकंठे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तालुका अध्यक्ष उत्तम कसबे यांनी केले आहे .