प्रतिनिधी/ माली पाटील
∆ भोकर - महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेच्या नुतन कार्यकारिणी निवड झाली असून यात नांदेड जिल्हा अध्यक्षपदी गुलाब वडजे तर सचीव म्हणून संजय देशमुख यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीचे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेची बैठक दि.१० डिसेंबर रोजी काळेश्वर मंदिर विष्णुपुरी, नांदेड येथील सभागृहात पार पडली असुन यात संघटनेची जिल्हा शाखा नांदेड जिल्हा कार्यकारणी निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीयअध्यक्ष श्री विलास ढेगे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा राज्य कार्यकारिणी पदाधिकारी श्री वसंत इंगळे यांच्या उपस्थितीत व राज्य प्रसिद्धी प्रमुख शिवकुमार देशमुख व मावळते जिल्हाध्यक्ष मधुकर मुंगल व जिल्हासचिव सुनील पारडे , अनुप श्रीवास्तव, अरूण चौधरी व विठ्ठल सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्राविअ यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी जिल्हाध्यक्ष पदी गुलाब वडजे
व जिल्हा सचिव पदी संजय देशमुख यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तर कार्याध्यक्षपदी संदीप कच्छवे, सहसचिव पदी प्रभाकर सोगे, जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रशांत कोकाटे, मोहन राहुलवाड, कोषाध्यक्षपदी बालाजी पंतोजी, कायदेशीर सल्लागार पदी शाम तरोडे, जिल्हा संघटक राजशेखर सोनसोळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी भोकर तालुकाध्यक्ष माधवराव ढगे, अर्धापूर तालुकाध्यक्ष भास्कर कापसे, सचिव जगन लाकडे, भोकर तालुका सचिव बालाजी कनोजवार, तसेच विविध तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य अशोक चव्हाण, अरविंद मुनगे, वनसागर, संतोष सितावार, मोहन आडकीने, के.डी सुर्यवंशी, शोभा पारसेवार, सुप्रिया घाटे, कविता बसंवते, कमल दासरे, स्मीता बुरकुले, यासह आनेक ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.