धनगर आरक्षण अंमलबजावणी मोर्चा साठी भोकर तालुक्यातुन शेकडो धनगर बांधव नागपूर कडे रवाना


                  प्रतिनिधी/ माली पाटील 

∆ धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी धनगर समाजाच्या वतीने नागपूर येथील विधान भवनावर प्रचंड मोठा मोर्चा ११ डिसेंबर रोजी धडकणार आहे.या मोर्चासाठी भोकर तालुक्यातुन शेकडो युवक व सकल धनगर समाजाचे कार्यकर्ते नागपुरकडे  रवाना झाले आहेत.

   धनगर समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सुची क्रं.३६ वर अनु-सुची जमातीचे आरक्षण दिले.पण येथे र' चा ड' करुन आरक्षणात खोडा घालण्यात आला.त्यामुळे गत ७० वर्षापासून धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आली नाही.सध्या न्यायालयात प्रकरण चालु आहे. त्यामुळे धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने हिवाळी अधिवेशन चालु असलेल्या नागपूर येथील विधान भवनावर दि. ११ डिसेंबर रोजी मोर्चा धडकणार असल्याने या मोर्चात सामील होण्यासाठी भोकर तालुक्यातील सकल धनगर समाजाचे शेकडो लोक नागपूर कडे रवाना होत आहेत.यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा असे आवाहन जेष्ठ नेते नागोराव शेंडगे बापू,रासपा अध्यक्ष मारोती वरणे, निलेश चिकाळकर,राज हाके पाटील यांनी केली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post