प्रतिनिधी /माली पाटील
∆ रस्ते गुळगुळीत झाल्याने गाड्यांचा वेग वाढला असून बेफाम गाड्या चालवण्यामुळे रस्त्यावर मोठे अपघात होत असताना दिसुन येत आहे. भोकर - उमरी रस्त्यावरील मोघाळी नजीक भोकर हुन आपल्या गावाकडे जाणार्या मोटारसायकलला एका हायवा टिप्परने जोराची धडक दिल्याने यात मोटारसायकल वरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
भोकर तालुक्यातील मौजे हाडोळी येथील संजय साहेबराव जाधव पाटील वय ४४ वर्षे, श्यामराव पुंडलिक पाटील मिराशे वय ५५ वर्षे हे दोघे आपल्या नातेवाईकांचा अंतिम संस्कार करून आपल्या हाडोळी गावाकडे मोटारसायकल वर निघाले ते मोघाळी गावा जवळ येताच समोरुन हायवा टिप्परने मोटारसायकल ला जोराची धडक दिल्याने यात मोटारसायकल स्वार संजय जाधव व श्यामराव मिरासे हे दोघे ही जागेवरच ठार झाले. हि घटना आज दि.२९ डिसेंबर शुक्रवार रोजी ठिक २ च्या सुमारास घडली.भोकर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दोघांच्या मृत्यूने हाडोळी गावात शोककळा पसरली आहे.