प्रतिनिधी /माली पाटील
दि. २९ डिसेंबर २०२३
∆ शिवसेना पक्षासोबत गद्दारी करून किती ही गद्दार निघुन गेले तरी राज्यातील जनतेचा विश्वास व आशीर्वाद माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनाच असुन येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचीच सत्ता येणार असल्याने शिवसैनीकानी आतापासूनच जोरदार कामाला लागावे असे प्रतिपादन मराठवाडा संपर्क नेते तथा माजी मंत्री रविंद्र वायकर यांनी भोकर येथील विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीत केले आहे.
भोकर विधानसभा मतदारसंघातील मुदखेड,अर्धापूर व भोकर या पदाधिकारी आढावा बैठक भोकर येथील गणराज मंगलकार्यालय आयोजित करण्यात आली होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रविंद्र वायकर बोलत होते.यावेळी व्यासपीठावर जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात, जिल्हा प्रमुख बबन बारशे,सह संपर्क प्रमुख दत्ता कोकाटे, जिल्हा प्रमुख बंडु खेडकर,उपजिल्हा प्रमुख माणीक लोमटे, जिल्हा समन्वयक अँड परमेश्वर पांचाळ, उपजिल्हा संघटक सुभाष नाईक, सुनील कदम, मुदखेड तालुका प्रमुख पिंटु पाटील वासरीकर, अर्धापूर तालुका प्रमुख संतोष कल्याणकर, भोकर तालुका प्रमुख संतोष आलेवाड,उप सभापती अशोक कपाटे,सतीष देशमुख, प्रदीप दौलतदार आदी उपस्थित होते.यावेळी वायकर म्हणाले की,शिवसेनेची कास हि हिदुंत्वाची असुन प्रखर हिंदुत्ववादी हिच शिवसेनेची ओळख पण इरशेल्या पेटलेल्या पक्षांनी सत्तेचा गैरफायदा घेत विविध यंत्रणा हाताशी धरून त्रास देण्याचा प्रकार वाढलाय.पण शिवसैनिक याला मुठमाती देत खंबीरपणे उध्दव साहेबांच्या पाढीशी उभा असुन येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसैनीक तत्पर रहावे असे शेवटी ते म्हणाले.यानंतर संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी शिवसेना पक्षाचे बळकटीकरण करण्यासाठी आता सर्कल वाईज बैठका घेण्यात येणार पदाधिकार्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पहावयाचे आहे त्यामुळे कामाला लागण्याचे आदेश व आव्हान केले आहे.
जिल्हाप्रमुख बबन बारशे, समन्वयक अँड पांचाळ यांनी ही मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार, तालुका संघटक नंदु पाटील कौठेकर,शहर संघटक राहुल कोंडलवार, शहरप्रमुख सचिन चंद्रे, माधव पांडे,अंकुश मामीडवाड, साहेबराव चव्हाण,सुधाकर सुर्यवंशी, साहेबराव भोंबे, रमेश महागावकर, विठ्ठल देवोड, सुनील जाधव, मनोहर साखरे, गंगाधर महादवाड, साईनाथ गादेपवाड, मारोती पवार, सुर्यकांत पिंगलवाड, संभाजी पोगरे, साहेब वाकोडे, गणेश आरलवाड, साहेब वाकोडे, बालाजी मादमवाड आदी सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.