प्रतिनिधी /माली पाटील
भोकर - लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत असुन यात भोकर पोलीस स्थानकाच्या निरीक्षक पदी नांदेड हून सुभाषचंद्र मारकड तर उपनिरीक्षक असलेले दिगंबर पाटील यांची धर्माबादला बदली करण्यात आली आहे.
सध्या लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निवडणूक आयोगाने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले असून या अनुषंगाने भोकर तालुक्यातील अनेक अधिकार्यांचे बदलीचे संकेत आहेत.यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी यांचा समावेश असल्याचे समजते.प्रशासकिय बदल्यांचे अनुषंगाने भोकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून सुभाषचंद्र मारकड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मारकड हे नांदेड शहर वाहतूकीचे काम पहात होते.तर येथे कार्यरत असलेले उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांची धर्माबाद येथे बदली करण्यात आली आहे. दिगंबर पाटील हे अत्यंत सक्षम असे अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामातून दाखवले होते. तसेच प्रशासकीय बदल्या करण्यात येत असुन कोणा कोणाची बदली होऊन कोणते अधिकारी भोकरला येतील हे पहावे लागेल.