सभापती राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेस जोडे मारुण शिवसैनीकानी केला निषेध

               प्रतिनिधी /माली पाटील 


भोकर - घटनेतील न्यायिक पदावर बसुन दुसऱ्याने लिहुन दिलेली स्क्रिप्ट वाचुन योग्य न्याय देता भ्रमित असा निकाल देणार्या सभापती राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेस भोकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोडे मारत जाहीर निषेध करण्यात आला.

 सत्ता संघर्षाचा पात्र अपात्र यांचा निर्णय दि. १० जानेवारी रोजी विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला.यात शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असून कोणतेही आमदार अपात्र नाही असा निर्णय दिला.या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील जनता  अचंबित झाली.तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून तीव्र निषेध करण्यात आला. राहुल नार्वेकर एका घटनेतील मुख्य पदावर कार्यरत राहुन योग्य निर्णय न देता कोणीतरी दिलेली स्क्रिप्ट वाचुन निर्णय दिला. असा निर्णय लोकशाहीत घातक असुन अशा दुर्दैवी निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी भोकर येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सभापती राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेस आंबेडकर चौकात जोडे मारुण आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हा समन्वयक अँड परमेश्वर पांचाळ, उपजिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर, तालुका प्रमुख संतोष आलेवाड, शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार, उप तालुका प्रमुख संभाजी पोगरे, रमेश महागावकर, गंगाधर महादावाड, राजेश पोगरे ,माधव सोनारीकर,दिव्यांग तालुका प्रमुख विठ्ठल देवोड, विशाल बुध्देवाड, पांडुरंग कटकमवाड सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. 

  

Post a Comment

Previous Post Next Post