भोकर येथे स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध ठिकाणी उत्साहात संपन्न

            प्रतिनिधी /माली पाटील 

∆ हिंदुर्हदयसम्राट, सरसेनापती स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती भोकर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

 स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दि.२३ जानेवारी रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्क कार्यालयात तालुका प्रमुख संतोष आलेवाड यांनी आयोजित केली होती.यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेची पुजा करण्यात आली.यावेळी शिवसेना जिल्हा उप-संघटक सुभाष नाईक किनीकर, समन्वयक अँड परमेश्वर पांचाळ, तालुका प्रमुख संतोष आलेवाड,उप जिल्हा समन्वयक माधव पा. वडगावकर, शहरप्रमुख पांडुरंग वर्षेवार, साहेबराव पाटील भोंबे, रमेश महागावकर, सुर्यकांत पिंगलवाड, दिव्यांग तालुका प्रमुख विठ्ठल देवड,विठ्ठल शेटकार आदी उपस्थित होते.तर जिल्हा समन्वयक अँड परमेश्वर पांचाळ यांच्या कार्यालयात ही शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी अँड.शेखर कुंटे, बालाजी राठोड,सुभाष नाईक किनीकर,माधव पा. वडगावकर, संतोष आलेवाड, पांडुरंग वर्षेवार,साहेब भोंबे, सुर्यकांत पिंगलवाड, रमेश महागावकर, विठ्ठल देवोड, संभाजी पोगरे, पत्रकार जयभीम पाटील, पत्रकार उत्तम कसबे,मारोती पवार, हनुमंत कोटमोड, रामदास पप्पुलवाड,वामण पर्वत, सोनुले,कैलास कानींदे, पांडुरंग कटकमवाड, विशाल बुध्देवाड आदी हजर होते.

    बाळासाहेब ठाकरे मार्ग येथे अभिवादन !

 भोकर येथील तहसील कार्यालयासमोर असलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे मार्ग येथे शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे पुजन माजी शिवसैनीक मोहन श्रीरामवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमास समन्वयक अँड.परमेश्वर पांचाळ,ता.प्रमुख संतोष आलेवाड, जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर,माजी तालुकाप्रमुख प्रदीप दौलतदार,उप जिल्हा समन्वयक माधव पा.वडगावकर, माजी जि.प.स.सुनील चव्हाण,गंगाधर महादावाड, संभाजी पोगरे, मारोती पवार, साहेबराव पाटील, रमेश पोलकमवार,शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार, सुर्यकांत पिंगलवाड,वामण महाराज, पांडुरंग कटकमवाड, साहेबराव वाकोडे, विठ्ठल देवोड, पत्रकार उत्तम कसबे, पत्रकार दत्ता बोईनवाड,कैलास कानींदे, विशाल बुध्देवाड आदी शिवसैनीक उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post