प्रतिनिधी / माली पाटील
भोकर - तालुक्यात ' चोरट्या मार्गाने होत असलेल्या "रेती"च्या वाहतुकीच्या कारभारत महसूल प्रशासन हाथमिळवनी करुन तहसिलच्या आवारात जमा केलेली हायवा रात्रीच्या गर्द अंधारत सोडून देण्यात आली याची चौकशी चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्याना निलंबित करावे या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश चंद्रे उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर दिनांक २५ जानेवारी पासून आमरण उपोषणास बसले आहेत.
उपोषणातील मागण्या पुढील प्रमाणे - दिनांक 15 डिसेंबर 2023 पर्यंत ते दि.8 जानेवारी 2024 पर्यंत दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेल्या गाडीचे नंबर व भरलेल्या दंडाच्या पावत्या, दिनांक 6 जानेवारी 2024 रोजीच्या मध्य रात्री पकडण्यात आलेल्या विना नंबर रेतीची हायवा गाडीचा पंचनामा करण्यात आला सदरील बाबही आर.टी.ओ.ला कळविली असल्यास त्याची दिलेल्या पत्राच्या छायांकीत प्रती देण्यात याव्या,महसुल प्रशासनाने गौण खनीज नियंत्रनासाठी नेमुण दिलेल्या पथकाची यादीची छायांकीत प्रत देण्यात यावी, दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी अवैद्यरीत्या रेती वाहतुक करणाऱ्या वाहणावर कार्यवाही करतांना गौण खनिज नियंत्रण पथकावर वाळु माफीयांकडून शासकीय कामात अडथळा करुण व शिवीगाळ करुण जिवे मारण्याची धमकी दिल्या बाबतच्या पथका कडुण दिलेल्या तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली, दिनांक 24 डिसेंबर 2023 ते दिनांक 24 जानेवारी 2024 पर्यंत महसुल कार्यालया मार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांची रात्रीच्या गस्तीची रवानगी व मोबाईल लोकेशन देण्यात यावे,वरील सर्व बाबींची चौकशी होई पर्यंत सदरील प्रकरणी मांडवली करणारे अधिकारी व कर्मचारी यांची इतरत्र बदली करण्यात येऊ नये, शासनाकडुन घरकुल लाभार्थ्यांना जेव्हा पासुन मोफत रेती देण्याची योजना आमलात आनली तेव्हा पासुन तालुक्यातील किती लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करुन देण्यात आली याची माहिती देण्यात यावी, भोकर शहर व ग्रामिण भागात अवैद्यरित्या जमविलेल्या रेती साठयांचा पंचनामा करुन घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटण्यात यावा व या अवैद्य साठ्यात तहसीलदार यांना जबाबदार धरुन त्यांचे निलंबन करण्यात यावे..
रेती तस्कर कामाजी तिडके व भोकर येथिल रेती दलाल शिवराज गणेश चिट्टे यांच्या सह इतर गाडी मालक व दलालांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यासह इतर इतर गुन्हे दाखल करण्यात यावे आदी मागण्याच्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते राजेश चंद्रे यांनी उपोषण सुरु केले असून या उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष इंजि. विश्वाभर पवार, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपसंघटक सुभाष नाईक,विविध पक्ष, तालुका दक्षता कमेटी सदस्य संभाजी चेरकेवाड,भोकर तालुका राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बालाजी नार्लेवाड, भीमटायगर सेना, युवा पँथर,आदींसह विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.
एकूणच येथील महसुल विभाग वरकमाईच्या नादात शासनाचे आदेश पायदळी तुडवत असून जिल्हाधिकाऱ्यांकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी या निमित्ताने केली आहे.