भडकाऊ किंवा प्रक्षोभक भाषण झाल्यास शहरात शांतता व कायदा बिघडु शकते म्हणून -सभेवर बंदी किंवा परवानगी देऊ नये- मनशे
प्रतिनिधी / माली पाटील
भोकर:-(प्रतिनीधी)दिनांक २२/०१/२०२४ रोजी झालेल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी व नंतर AIMIM पक्षाचे प्रमुख मा. खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी प्रक्षोभक व भडकाऊ विधान (बयान) केलेले आहे. भोकर हे शांतताप्रिय शहर असून AIMIM पक्षाचे खासदार मा. इम्तियाज जलील यांच्या उद्या दिनांक २७/०१/२०२४ रोजी होणाऱ्या सभेत त्यांच्याकडून एखादे प्रक्षोभक किंवा भडकाऊ वक्तव्य करण्यात आल्यास शहराची शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सध्या सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय नांदेड यांचे जमाव बंदीचे आदेश देखील लागू आहेत. त्याअनुषंगाने भोकर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून उद्या दिनांक २७/०१/२०२४ रोजी भोकर येथील मोंढा मैदानात होणाऱ्या AIMIM पक्षाचे खासदार मा. इम्तियाज जलील यांच्या जाहीर सभेस परवानगी नाकारण्यात यावी. असे गांभीर्य लक्षात घेऊन दिनांक २७/०१/२०२४ रोजी भोकर येथील मोंढा मैदानात होणाऱ्या AIMIM पक्षाचे खासदार मा. इम्तियाज जलील यांच्या जाहीर सभेस परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवेदनावर साईप्रसाद जटालवार ता.अध्यक्ष,मनसे, भोकर ,माधव मेकेवाड शहराध्यक्ष म.न.से भोकर, गोविंद पा. आगलावे ता.संघटक मनसे,भोकर यांच्या सह्या आहेत.