तलाठी परीक्षेत झालेल्या गैरप्रकारची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची युवक काँग्रेसची मागणी

 

              प्रतिनिधी / माली पाटील 

भोकर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तलाठी भरती मध्यें झालेल्या घोटाळ्या ची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी.आणि दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अशा आशयाच्या मागणीचे निवेदन तहसिलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महसुल मंत्री, जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले आहे.        

     भोकर तालुका युवक कांग्रेस अध्यक्ष अत्रीक पाटील मुंगल यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार राजेश लांडगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने तलाठी या पदाच्या भरतीचे कंत्राट टिसीएस या कंपनीकडे देण्यात आले.या टिसीएस कंपनीने आँनलाईन परीक्षा घेतली. पण यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला आहे. या परीक्षेत गुणवत्ता नसतानाही दिलेल्या गुणापेक्षा म्हणजे २०० गुण असताना २१४ असे जास्तीचे गुण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षा कधीच दिली नाही. या तलाठी परीक्षेत ते विद्यार्थी टॉपर झाले आहेत. टीसीएस कंपनीने नार्बलायझन गुणाचे केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना शंका निर्माण झालेली आहे. टीसीएस कंपनीने प्राप्त आणि वाढलेले गुण याची नवीन यादी लावली पाहिजे, त्यामुळे शंका दूर होईल. तसेच काही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडलेले आहेत. यात अनेक विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले गेले आहे. याची चौकशी झाली पाहिजे. तसेच येथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा युवक काँग्रेसकडून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. या परीक्षेतील गैरप्रकारची एसआयटी मार्फत चौकशी करावी. अन्यथा युवक काँग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर  तालुका सचिव गणेश यादव, तालुका शहर अध्यक्ष श्रीकांत दरबस्तवार, युवक चे शहर अध्यक्ष सुजित कोंडलवार,सचिव माधव पाटील बोरगांवकर,सचिव नामदेव कोरंटलू,नीळकंठ वर्षेवार, संतोष गागदे, ,युवक कांग्रेस चे उपाध्यक्ष मोघाळीचे मा.सरपंच धनराज पाटील, कामनगावचे सरपंच राघोबा पाटील सोळंके, शहर उपाध्यक्ष आनंद दादा ढोले,तालुका युवक उपाध्यक्ष सुनिल पाटील मातुळकर,विद्यार्थी कांग्रेस चे तालुकाध्यक्ष :विठ्ठल पाटील धोंडगे. युवक काँग्रेसचे सोशल मिडिया अध्यक्ष श्रीधर जाधव. तालुका सचिव साई पाटील येलुरे, योगेश हाळदेकर, संदीप येलुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.





Post a Comment

Previous Post Next Post