प्रतिनिधी / माली पाटील
भोकर - कुटुंबातील नातेवाईकाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करून कारने परत नवीपेठ (तेलंगाना) येथे जाणाऱ्या भालेराव कुटुंबीयावर काळाने घाला घातला. कारचा पुढचा टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण बिघडल्याने कार पुलावरून नाल्यात कोसळली.यात काय मध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. भोकर-उमरी रोडवरील हाळदा -मोघाळी दरम्यान असलेल्या पुलावरून गाडी खाली नाल्यात कोसळली.या घटनेत पाच जनांचा मृत्यू झाला आहे.यात सहा व सात अशा दोन मुलांचा समावेश आहे. सविता शाम भालेराव वय 25 रेखा परमेश्वर भालेराव वय 30 अंजना सुरेश भालेराव वय 30 प्रीती परमेश्वर भालेराव वय सहा सुशील मारुती गायकवाड वय सात असं मैदानाची नावे आहेत.
भोकर तालुक्यातील मौजे रेणापूर येथील भालेराव कुटुंबीय हे तेलंगाना राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील वनेल, नवी पेठ येथे वीट भट्टीच्या कामाला होते. सदरील कुटुंब हे भोकर शहरातील शेख फरीदनगर येथे राहणारे संतोष भालेराव यांच्या मुलींच्या पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी गुरुवारी आले होते. वाढदिवस साजरा करून रात्रीच्या वेळी अकरा जण परत चार चाकी वाहनाने वनेर येथे जात होते. दरम्यान उमरी- भोकर रस्त्यावरील मोघाळी शिवारातील पुलावरून जात असताना वाहनांचे पुढचे टायर फुटले अन चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटले आणि ते वाहन पुलावरून थेट नाल्यात कोसळले. नाल्याला पाणी असल्याने दोघांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला तर इतर तीन जणांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.यात सविता श्याम भालेराव वय २५, रेखा परमेश्वर भालेराव वय ३०, अंजना सुरेश भालेराव वय ३०, प्रिती परमेश्वर भालेराव वय ६, सुशील मारोती गायकवाड वय ७ वर्षं यांचा मृत्यू झाला आहे. शिवाय दत्ता ज्ञानेश्वर भालेराव वय ७, प्रितेश परमेश्वर भालेराव वय ८, सोहम परमेश्वर भालेराव वय ७, श्याम तुकाराम भालेराव वय ३५, ज्ञानेश्वर तुकाराम भालेराव वय २८, परमेश्वर तुकाराम भालेराव वय २८, श्रीकांत आरगुलवाड आदी जण जखमी झाले आहेत. यातील गंभीर जखमी शाम भालेराव यांना नांदेड येथे उपचारासाठी घालवण्यात आले आहे. तर उर्वरित जखमीवर भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. जेव्हा ही कार नाल्यात कोसळली तेव्हा कारमधील काही जण आरडाओरड केली तेव्हा रब्बी पिकांसाठी पाणी देणारे शेतकरी धावुन आले.आणि पोलिसांना खबर दिली.तेव्हा भोकर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, स. पोलीस निरीक्षक कल्पना राठोड, दिलीप जाधव, संभाजी देवकांबळे, जमादार रवी मुधोळे, परमेश्वर कळणे, लहू राठोड, मंगेश क्षीरसागर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते जुनेद पटेल, सुलेमान शेख, शाहरुख खान आदींनी वाहनात अडकलेल्यांना बाहेर काढले. हे सर्वजन मौजे रेणापूर येथील रहिवासी असुन या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.