भोकर येथे कोल्हापूर -धनबाद या सुपरफास्ट रेल्वेखाली येऊन तरुण जागीच ठार

             प्रतिनिधी /माली पाटील 

भोकर दि. ९ - दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी ठीक नऊ वाजता हित नगर जवळ कोल्हापूर- धनबाद या सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे खाली येऊन एका तरुणाचे जीव गेले आहे. कोल्हापूर- धनबाद ही सुपरफास्ट रेल्वे येण्याच्या सुमारास राजेश्वर पांडुरंग नारमवाड वय २५ वर्षं रा. चिंचाळा ता.भोकर  हा तरुण रेल्वे पटली ओलांडत असताना या गाडीखाली येऊन जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे आरपीएफ कैलास कोठुळे,भोकरचे बिट जमादार कानगुले,हे.का. जोंधळे यांनी घटनास्थळी येऊन भेट दिली.मयत राजेश्वर नारमवाड हा भोकर पासून जवळच असलेल्या मौजे चिंचाळा येथील रहिवासी असुन तो अविवाहित असल्याचे समजते.


Post a Comment

Previous Post Next Post