भारत भुमीच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य योध्दे नवसाजी नाईक यांच्या शौर्याची तरुणाने प्रेरणा घ्यावी - श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर


.            प्रतिनिधी / नंदेश्वर भुतनर    

तामसा दि.४ - ब्रिटिश व निजामाच्या सैन्यासोबत स्वातंत्र्याचा पहिला लढा देणारे आद्य क्रांतिवीर हंसाजी नाईक व नवसाची नाईक यांनी नेटाने लढा देऊन केवळ सहा दिवसात ब्रिटिशांना गुडघे टेकायला भाग पाडले होते. ते स्वातंत्र्य योध्ये आद्य क्रांतीवीर नाईक हे एका जातीसाठी, एका धर्मासाठी, एखाद्या विशिष्ट पंथासाठी स्वतःचा किंवा आपल्या कुटुंबाचा विचार न करता सबंध मानव जातीच्या उद्धारासाठी व भारतभूमीच्या रक्षणासाठी स्वतःचे बलिदान दिले. म्हणून आजच्या तरुणांनी त्यांच्या या शौर्याची प्रेरणा घ्यावी असे गौरव उद्गार इंदोर होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर यांनी काढले. शौर्यभूमी मौजे नावा तालुका हादगाव येथे आद्य क्रांतिकारक राजे नवसाची नाईक स्वातंत्र्ययुद्धे यांच्या आयोजित स्मृती सोहळ्यात अध्यक्ष पदावरून ते बोलत होते.

   तामसा येथून जवळच असलेल्या मौजे नाव्हा ता.  हदगाव या शौर्यभूमीत शूरवीर नवसाजी नाईक यांचा स्मृती सोहळा ३१ रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. यशपाल भिंगे, माहूरगडचे महंत परमपूज्य शाम भारती महाराज, माजी खा. सुभाष वानखेडे आ. माधवराव पा. जवळगावकर, बाबुराव कदम कोहळीकर काँग्रेसचे डॉ. अंकुश पा. देवसरकर, अँड. के.के शिंदे, भास्करराव पंडागळे बळवंतराव नाईक, सुभाष नाईक किनीकर, शशिकांत वडकुते, पंजाबराव वडकुते, भास्करराव बेंगाळ, बालाजी राठोड, विवेक देशमुख, राजेश फुलारे, बाबुराव हराळे, साईनाथ फुलारे, चिकणे पाटील, पत्रकार उत्तम कसबे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक यशपाल भिंगे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे. स्वातंत्र्याची प्रबळ इच्छाशक्ती इथल्या मातीचे देण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे मावळे या भूमीची शान आहेत हटकर राजा नवसाची नाईक घट्ट पाय रोवुन ब्रिटिशांशी लढण्यासाठी उभा राहिला. नवसाची नाईक यांनी कोणाचेही मांडलिक होण्यास नकार देऊन स्वतःला स्वतंत्र राजा घोषित केले. निजामाविरुद्ध बंड पुकारले ८ जानेवारी १८१९  रोजी नाव्हाचा गढीवर इंग्रजांनी हल्ला केला. पुढे दगा फटका झाला आणि नवसाची नाईक इंग्रजांच्या हाती सापडले. दोनशे वर्षांपूर्वी या मातीत प्रेत पडत होती. आरोळ्या, किंचाळ्यांनी हा मुलुख किर्र झाला होता. नवसाची नाईक यांनी केवळ सहा दिवसात ब्रिटिशांना गुडघ्यावर बसविले होते. हा इतिहास आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रस्तावना नाईकाचे वंशज डॉ. प्रकाश राव नाईक यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. अशोक कडबे यांनी केले आभार डॉक्टर भगवानराव निळे यांनी मानले. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर भगवान निळे, डवरे, सरपंच कुंडलिक नरवाडे, दिगंबर साखरे, विठ्ठल मस्के, श्रीनिवास हुलकाने, आकाश लाकडे, अवधूत चोंडेकर, राम मस्के, नंदेश्वर भुतनर, गजानन सुकापुरे आदीनी केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post