प्रतिनिधी / माली पाटील
∆ मौजे पाकी गाव ते श्रंगी आश्रम सावरगाव मेट ते पंढरपूरला पायी जाणार्या दिंडी सोहळा व पालखीचे भोकर येथे शनी मंदीरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी वारकरी संप्रदायाकडुन माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज यांचा गजर करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे यंदाही भोकर तालुक्यातील मौजे पाकी व सावरगाव मेट ते पंढरपूर अशी पाय दिंडी यात्रा व पालखी निघते.वैकुंठवाशी ह.भ.प.रामदास महाराज पाकीकर यांनी चालू केलेल्या या पाय दिंडी यात्रेचे हे ३३ वे वर्षं आहे. वै.रामदास महाराज यांच्या पश्चात ह.भ.प.मारोती महाराज नांदेकर, ह.भ.प. लक्ष्मण महाराज कोंडदेव नगरकर,विणेकरी ह.भ.प. सुरेश महाराज पाकीकर, ह.भ.प. लक्ष्मणदास शास्त्री महाराज जामदारीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी यात्रा सुरू आहे. दि.३ फेब्रुवारी रोजी निघालेल्या दिंडी व पालखीचे शनी मंदिर भोकर येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भव्य स्वागत करण्यात आले.शिवसेनेचे जेष्ठ नेते साहेबराव पाटील भोंबे यांच्या वतीने शिवसेना जिल्हा उप-संघटक सुभाष नाईक किनीकर यांच्या हस्ते श्री मारोती महाराज नांदेकर, श्री लक्ष्मण महाराज कोंडदेव नगर कर, श्री सुरेश महाराज पाकीकर, श्री जनार्दन महाराज जामधरीकर, श्री साईनाथ पा. महाराज कोळगावकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सेनेचे साहेबराव पाटील भोंबे, रमेश महागावकर, गणपत पांडलवार, दिव्यांग सेनेचे तालुका अध्यक्ष विठ्ठल देवोड, पत्रकार उत्तम कसबे, प्रकाश बोंदीरवाड, मारोती वाघमारे, बालाजी पा.भोंबे, गोविंद उटनुरवाड महाराज,व्हा.चेरमन रवि करेवाड, सदस्य साईनाथ कोटुरवाड सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
"नाचत नाचत जाऊ माऊलीच्या पंढरी ! विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी ! विठ्ठल तोंडी उच्चारा "!