प्रतिनिधी / माली पाटील
भोकर- १ जानेवारी २०२४ पासून पुढील वाढीव टप्पा वाढ मिळेपर्यंत अशंत: अनुदानित शिक्षक व प्राध्यापकांचा इयत्ता १० वी व १२ वी परिक्षेच्या बोर्ड पेपर तपासणी वर बहिष्कार टाकण्याचा इशारा भोकर येथील शिक्षक समन्वय संघाने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
मुंबई येथील आझाद मैदानावर अशंत: अनुदानित शाळेतील शिक्षकांना अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा या मागणीसह इतर मागण्या करीता ३ जानेवारी २०२४ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.अद्यापर्यंत सदरील मागण्याबाबत शासनस्तरावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही.त्यामुळे राज्यातील सर्व विभागीय मंडळांमध्ये सुरु असलेल्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड पेपरच्या तपासणी वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.समान काम समान वेतन या मागणीनुसार गत पंधरा -विस वर्षांपासून विन अनुदानित व अशंत: अनुदानित शाळेतील शिक्षकांचा संघर्ष चालू आहे. दि.१ जानेवारी २०२४ पासुन प्रत्येक वर्षी अनुदानाच्या वाढीव टप्याचा शासन निर्णय निर्गमित करेपर्यंत पेपर तपासणीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.तहसिलदार यांना दिलेल्या या निवेदनावर संगीता राठोड, योगेश्वरी शिंदे,व्हा.डी सुकरे,नरेश पाकलवाड,आर.पी.खांडरे,पा.व्ही.हाके,एम.जी नरवाडे, एम.एस तोंदरे,एस.एच.बोमनेवार,साईकुमार गौड,एम.डी.मुलदुलवाड,एस.जे.मैलापुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.