प्रतिनिधी /माली पाटील
∆ नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दुसऱ्या टप्प्यातील २६ जुनं रोजी मतदान होणार असुन काँग्रेस ने माजी आमदार वसंतराव चव्हाण (व्हि.सी) यांची उमेदवारी जाहीर केली तर महायुतीकडून भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर (पि.सी) यांची उमेदवारी जाहीर झाली.यामुळे यंदा नांदेड लोकसभेत रंगतदार चुरस पाहण्यास मिळणार असुन लोकांची भावना व वसंत चव्हाण यांचं असलेला मतदार संघात स्नेह संबंध पहाता हि निवडणूक भाजपच्या उमेदवारास जडच जाणार असल्याचे दिसून येत आहे. चिखलीकराना म्हणता तेवढी निवडणूक सोपी नाही असी चर्चा ही जोरात सुरू आहे.
भारतीय जनता पक्ष अब की बार ४०० पारचा नारा दिला आहे.व त्या पद्धतीने कार्यक्रम सुरु आहे.पण भाजपच्या तोडो फोडो व सरकारी यंत्रणाचा गैर फायदा घेत सुडबुद्धीचे राजकारण करत असल्याने जनता अशा घाणेरड्या राजकरणास कंटाळली आहे. व याचा थेट परिणाम मतात होणार असल्याचे दिसते. भाजपचे शेतकरी विरोधी धोरणे, बेरोजगारांना नौकरी नाही.मालाला भाव नाही,मराठा,धनगर व मुस्लिम आरक्षणाचा विचका, कापूस व सोयाबिनचे पडलेले भाव यामुळे शेतकऱ्यांत सरकार विषयी चिड निर्माण झाली आहे.त्यामुळे ही लोकसभा चुरशीची होईल असे सध्या तरी दिसत आहे. दि.२१ रोजी काँग्रेस पक्षाने ७ जनाची उमेदवारी जाहीर केली आहे.यात नांदेड लोकसभेसाठी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस उमेदवार यांचा नांदेड लोकसभेतील नायगाव विधानसभा, देगलुर- मुखेड विधानसभा,दक्षिण विधानसभा मतदारसंघात वसंत चव्हाण यांचे नाते संबंधी लोक मोठ्या प्रमाणावर आहेत.त्याचा फायदा चव्हाणांना होणार आहे.सोबत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची साथ व सलग तीन टर्म नायगाव विधानसभा आमदार म्हणून केलेले काम,सर्व जुनी वजनदार असलेली बुद्रुक मंडळी यांची साथ यामुळे वसंतराव चव्हाण यांचे पारडे जड वाटते.ईकडे महायुतीचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली.पण ही जागा भाजपच्या सर्वे मध्ये डेंजर झोनमध्ये होती. त्यामुळे येण केण प्रकार पुढे करून व ईडी, सीबीआय चार धाक दाखवून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना पक्षात घेतले.पण जरी अशोकराव चव्हाण भाजप प्रवेशकर्त्ये जरी झाले तरी अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षातच रहाणे पसंद केले.यामुळे अशोक चव्हाण यांचा कितपत फायदा उमेदवाराला होईल सांगणे अवघड आहे.दुसरी गोष्ट मोदी बिदी लाट नाही,गत पाच वर्षांत कोणतेही ठोस काम केल्याचे प्रताप चिखलीकर यांच्या कडून दिसत नाही.मतदार संघातील अनेक गावात निधी दिला नाही की गावांना भेट दिली नाही.यामुळे चिखलीकरावर जनता जाम नाराज असल्याचे चित्र आहे. आणि मतदार बोलुन दाखवत आहेत.
दि.२२ मार्च रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांचा उमरी, धर्माबाद येथे जंगी स्वागत करण्यात आले.त्यांच्या सत्कारासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता.यावरुन तरी महाविकास आघाडीचे पारडे जड आहे असे दिसते. भोकर तालुक्यातुन वसंत चव्हाण यांना मोठी आघाडी मिळवून देण्याच आश्वासन काँग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनी दिले आहे.