प्रतिनिधी / माली पाटील
भोकर - धनशक्ती विरुध्द सर्व सामान्याचा उमेदवार म्हणजेच जनतेचा असी लढत होणार असुन यात पक्ष बदलणार्या पेक्षा निष्ठावान असलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना भरघोस आशिर्वाद रुपी मते देऊन विजयी करा असे आवाहन रविंद्र उर्फ बंडु पाटील चव्हाण यांनी पाळज येथील प्रसिद्ध गणेश मंदिरात प्रचाराचा नारळ फोडल्यावर कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले.
भोकर तालुक्यातील मौजे पाळज येथे रविवार दि.२४ मार्च रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रसिद्ध श्री गणेश मंदिरात नारळ फोडुन करण्यात आला.काॅंग्रेसचे नायगाव येथील नेते रविंद्र चव्हाण व शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.यानंतर चेअरमन गणेश दंडेवाड यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रकाश देशमुख भोसीकर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय शेळगावकर, गोविंद पाटील कोंडलवाड, राष्ट्रवादी चे अँड.शिवाजी कदम, शिवसेनेचे अँड. परमेश्वर पांचाळ, सुभाष नाईक किनीकर,श्रीमती मनोरम्माताई करेमगार, तौफिक इनामदार, निळकंठ वर्षेवार,आप्पाराव राठोड आदी उपस्थित होते.
निधीच्या नावाखाली मंदिरांना फसवणाऱ्या भाजपच्या उमेदवारास या निवडणुकीत दाखवुन देणार असा निर्धार बैठकीत करण्यात आला.यावेळी गोविंद पाटील, अँड. शिवाजी कदम, अँड.परमेश्वर पांचाळ,गणपत जाधव,मनोराबाई करेमगार,संजय शेळगावकर आदींची भाषणे झाली.या सर्वांनी जनतेचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना निवडुण देण्याचे आवाहन केले. यावेळी गिरीश पा.रावनगावकर,सेनेचे विठ्ठल देवोड,संजय रैतुवाड, साईनाथ आसरवाड, गणेश दंडेवाड, पवन चटलावार, सरपंच बळीराम कदम, बाबुराव कुंभीकर, सेनेचे तानाजी जाधव, दिलीप उत्तरवार,दत्ताही पाटील,
दत्तात्रय पापीनवार, श्रीनिवास शिंदे,गजानन ढगे सरपंच, नितीन चौरेकर, रामदास कोटावाड, सुभाष जाधव, साईप्रसाद चटलावार, लक्ष्मण पुस्पुरवाड, कमलताई नर्तावार, सुरेखा माळी, चंद्रकला गायकवाड, रुपाली श्रीखंडवाड, अनिता साबळे, यशोदा शेळके, पत्रकार उत्तम कसबे, पत्रकार अनिल डोईफोडे, पत्रकार दत्ता बोईनवाड आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लक्ष्मण डोंगरे यांनी केले.तर आभार संजय रैतुवाड यांनी मानले.