सेवा समर्पण परिवाराच्या वतीने पत्रकार परिषद
प्रतिनिधी/ माली पाटील
∆ सकाळ समुहाचे संपादक तथा व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक संदीप काळे यांना राज्यस्तरीय पत्रकारिता सेवा समर्पण पुरस्कार तर
∆सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभिजीत सोनवणे यांना राज्यस्तरीय समाजसेवा सेवा समर्पण पुरस्कार
[ पुरस्काराचे स्वरूप रोख ११०००/- मानपत्र व सन्मानचिन्ह असे राहील ]
_____________
भोकर तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्षेत्रात मोलाची सेवा बजावणाऱ्या सेवा समर्पण परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधक विविध कार्यक्रम भोकर येथे आयोजित करण्यात आले असून यानिमित्त दरवर्षी राज्यस्तरीय देण्यात येणारे सेवा समर्पण पुरस्कार त्या त्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक व्यक्तींना देण्याची जाहीर करण्यात आल्याची माहिती, पत्रकार परिषदेत सेवा समर्पणाचे अध्यक्ष राजेश्वर रेडी लोकावाड व सचिव विठ्ठल फुलारी यांनी माहिती दिली.
सेवा समर्पण परिवाराच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दि.२९ मार्च २०२४ रोजी नागापूर ता. भोकर येथे नेत्र रोग शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दि.३० मार्च रोजी सकाळी दहा वाजता माऊली मंगल कार्यालय किनवट रोड, भोकर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य पंजाब चव्हाण, प्राचार्य संजय देशमुख, मुख्य अधिकारी मारुती जगताप यांची उपस्थिती राहणार आहे. दि. ३१ मार्च रोजी माऊली मंगल कार्यालय किनवट रोड, भोकर येथे सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सेवा समर्पण परिवाराच्या वतीने सकाळ समूहाचे संपादक तथा व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक संदीप काळे यांना राज्यस्तरीय पत्रकारिता सेवा समर्पण पुरस्कार तर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभिजीत सोनवणे यांना राज्यस्तरीय समाजसेवा समर्पण पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप ११०००/- हजार रुपये व मानपत्र, सन्मान चिन्ह असे राहणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक दत्ता भगत, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अव्वर सचिव राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे. भोकर येथे होणाऱ्या या सेवा समर्पण परिवाराच्या कार्यक्रमाचा लाभ भोकर तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा असे आव्हान सेवा समर्पन परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.या पत्रकार परिषदेत डॉ.रामेश्वर भाले, बालाजी काळवणे, दिगाबंर देशमुख,रवि देशमुख आदींची उपस्थिती होती.