भोकर/ निवडणूक वार्तापत्र
∆ सध्या राज्यात नेते कार्यकर्ते मुळ धोरणा पासुन फारकत घेत या पक्षातुन दुसऱ्या पक्षात जाण्याची जणु काही स्पर्धाच सुरू असल्यागत दिसुन येत आहे.भारतीय जनता पक्षाच्या या पक्षफोड वृत्तीमुळे सर्व सामान्य जनतेत चीड निर्माण झाली आहे.शासकिय यंत्रणेचा गैरवापर करत अनेक भ्रष्ट नेते पक्षात घेऊन भाजप भ्रष्टाचाराचा राजकारणातला बाप बनला आहे. जरी नेते पक्ष सोडून गेले तरी या तोडफोडीच्या राजकारणाचा फायदा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीलाच होण्याची शक्यता असुन आजही ग्रामीण भागात लोकांचा कौल काँग्रेस पक्षाला असल्याचे लोकांच्या बोलण्यातून दिसून येत आहे.
भोकर विधानसभा हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला पण काही दिवसांपूर्वी समविचारी धारा सोडत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी हिंदुत्ववादी धोरण स्वीकारत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे त्यांचे नजिकचे अनेक कार्यकर्ते भाजपची वाट धरली.पण जे काँग्रेस म्हणून मुळ धारेत वावरले ते कार्यकर्ते मात्र काँग्रेस मध्येच ठाम आहेत. अन् या कार्यकर्त्यांना लोकांचं बळ पण मिळेल यात शंका नाही.अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाची वाताहत झाली.हे जरी सत्य असले तरी ग्रामीण भागात आजही काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आहे.हे लोकांना भेटल्यावर कळाले.या पक्षाला उभारी देण्यासाठी जेष्ठ नेते तथा माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब पाटील रावनगावकर, ग्रामीण शैलीतुन भाषणात दम आणणारे माजी सभापती प्रकाशराव देशमुख भोसीकर, कोणाची ही हुजरेगिरी न करता चौफेर फटकेबाजी करणारे निळकंठ वर्षेवार, मुस्लिम नेते तौशीफ इनामदार, प्रताप पाटील महागावकर, मुत्यालवाड त्रिपतरेड्डी आदी सह अनेक युवा नेतृत्व असलेले कार्यकर्ते,काही सरपंच, चेअरमन हे प्रयत्न करीत आहेत.त्यांच्या या यशाला ग्रामीण भागातील जनतेचा पाठिंबा मिळत असुन लवकरच भोकर तालुक्यात काँग्रेस पक्षाला अच्छे दिन येणार यात काही शंका नाही.भाजप पक्षाच्या धोरणाला जनतेचा तीव्र रोष दिसून येत आहे. अशोक चव्हाण यांच्या पक्ष बदलामुळे लोकांत नाराजीचा सुर दिसून येत आहे.
.खा.अशोक चव्हाण यांचा जिल्हा भाजप पक्षावर कब्जा भाजप कार्यकर्त्यांमध्ये चिलबिल
भारतीय जनता पक्षात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण दाखल झाल्याने आपुसकच त्यांचे हजारो कार्यकर्ते पक्षात डेरेदाखल झालेत.आता नांदेड जिल्हा भाजपमध्ये चव्हाण यांचे वर्चस्व राहणार असल्याने भाजपच्या मुळ कार्यकर्त्याची पंचायत झाली आहे.त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत यांची प्रचीती दिसून येईल. काही झाले तरी लोकसभा निवडणुकीत भोकर तालुक्यातुन महाविकास आघाडीला जोरदार पाठिंबा मिळण्याची शक्यता दिसुन येत आहे. कारण चौकाचौकात, हाॅटेलवर, पानटपरीवर, दुकानात लोक चर्चा करताना दिसुन येत आहे.यात लोक महाविकास आघाडीचच जास्त वाजवताना दिसून येत आहे.