प्रतिनिधी / सुभाष नाईक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय आपले हक्क ही आपल्याला कळत नाही, अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणसिंग समाजात फुंकले डॉ. बाबा साहेबांच्या आचार विचारात राष्ट्रप्रेम,राष्ट्रनिष्ठा भरलेली होती.हे मानव जन्मी आले नसते तर आज दिन दलित, श्रमिक, शोषितांचे जीवन अंधारकारमय झाले असते असे प्रतिपादन ज्येष्ठ बहुजन नेते नागराव शेंडगे बापू यांनी केले.
भोकर तालुक्यातील मौजे आमदरी येथे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची १३३ वी जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला होता, त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक माधव लोखंडे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष उत्तम कसबे, निवृत्त अधिकारी रमेश गायकवाड, बौध्दाचार्य गजबारे हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेंडगे बापू म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांना त्यांचे हक्क मिळावे म्हणून त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजीवीच्या साठी ही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहिले. केवळ दलितांसाठीच नव्हे तर शेतकरी व शेतमजूर यांच्या प्रश्नासाठी त्यांनी जोरदार लढा दिला आहे. अशा या महान मानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीची कर्तव्य होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय असेही ते शेवटी म्हणाले. यानंतर रमेश गायकवाड, बौद्धाचार्य गजभारे, माधव लोखंडे, उत्तम कसबे यांचे समाजाची भाषणे झाली हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान शिरसागर लक्ष्मण क्षीरसागर जळगाव क्षीरसागर संजय शिरसागर साहेबराव क्षीरसागर भीमराव क्षीरसागर रवी क्षीरसागर यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार भोकर रुलर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक जळबा क्षीरसागर यांनी केले.