नांदेड लोकसभेच्या निवडणुकीत नेते विरुध्द जनता लढाईत कोण बाजी मारणार !

    

                            प्रतिनिधी / माली पाटील 

 ∆ भोकर - नांदेड लोकसभेची निवडणूक अंत्यत अटीतटीची होत असून सदर निवडणुकीत  भाजप कडून मातब्बर नेते एका बाजूने निवडणूक प्रचार उतरले असून तर दुसरीकडे जनताच हि निवडणूक हातात घेतल्याचे दिसून येते. त्यातील अनेक नेते पूर्वाश्रमीच्या कांग्रेस पक्षाचे राज्यातील प्रमुख होते. त्यांच्यावर अनेक प्रशासकीय यंत्रने कडून तपास सुरू होता. त्यामुळे ते जेल वारीच्या भीतीने भाजपात प्रवेश करून पवित्र गंगाजल घेऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन भाजपला निवडून देण्याचे आव्हान करत आहेत. तर त्यांचे अनेक जुने सहकारी नाईलाजाने त्यांच्या सोबत तोंड लपवून प्रचारात उतरले आहेत. पण मतदारसंघात त्यांना गावोगावी मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत असुन आता मतदारचा कौलच वसंत बहरणार असल्याचे चित्र आज तरी दिसत आहे. 

    मूळ भाजप कार्यकर्ते प्रचारात सहभागी तर झाले पण ज्यांच्या विरोधात आज पर्यत एकनिष्ठेने भाजपचे काम इमानेइतबारे केले. त्यांना विरोध केला नाही ते आरोप प्रत्यारोप केले. त्यांना मात्र मतदारसंघात कोणत्या तोंडाने भाजपला मत मागावे हा प्रश्न भेडसावत आहे. एकंदरीत चित्र पाहिलं तर मूळ भाजपाई  व आयात भ्रष्टाचारी यांच्यात ताळमेळ लागत नसल्याचे दिसून येते. वरवर बघितलं तर भाजपचा प्रचार जोमात दिसतो. पण आतून बघितलं तर भाजप कार्यकर्ते कोमातच आहेत. कारण मतदार घरात तर कार्यकर्ते दारात उभे असल्याचे दिसून येते. त्यामुळे स्टार्च प्रचारकही हतबल होऊन चेहऱ्यावरचा घाम पुसत आहेत. आत्मा हि निवडणुक जनताच हाती 

घेतली असून खरी लढाई जनता विरुध्द नेते असी लढाई होत आहे . त्यामुळे या मतदारसंघात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा,मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा घ्याव्या लागल्या तरी मतदारांचा मुड काही बदलला नसल्याचे चित्र दिसून येते.                                 २०१९  च्या निवडणुकीत भाजप नेते , कार्यकर्ते ज्या जोमाने प्रचार , प्रसार करताना दिसून येत होते. ते आज गटागटाने प्रचार , प्रसार करताना दिसून येत आहेत. गावागावात भाजप नेत्यांना व कार्यकर्त्यांना मतदार आपुलकीने बोलत नसल्याने भाजप उमेदवाराची धाकधूक वाढली त्यातच मराठा , मुस्लिम ,वंचित , शेतकरी , कष्टकरी मतदार यांचा भाजपला वाढता विरोध पाहून भाजपने जाती जातीत फोडाफोडीचे सूत्र सुरू केल्याचे दिसते. 

    कांग्रेस उमेदवार मात्र शांतपणे जेवढे इमानदार कार्यकर्ते सोबत आहेत. त्यांना घेऊन अगदी नियोजन बद्ध पद्धतीने कुणावरही आरोप , प्रत्यारोप न करता  डोर टू डोर प्रचार , प्रसार करताना दिसून येत आहेत त्यांना गावोगावी , गल्ली गल्लीत सर्व जाती , धर्मातील मतदारांकडून मिळणार प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या मागील आमदार कीच्या काळात कमी जास्त प्रमाणात कामे झाली असतील , नसतील पण त्यांनी कधी कुठल्या अधिकाऱ्यांना ,  कर्मचाऱ्यांना ,व्यापाऱ्यांना त्रास दिला नाही हे विशेष ! तसेच शेतकऱ्यांना , कष्ठकरांना त्यांनी नेहमीच सन्मानाची वागणूक दिली  , कधीच त्रास दिला नाही  आज घडीला वर्तमानपत्रात , सोशल मीडियावर भाजपचा प्रचार जोरात दिसत असला तरी मतदार मात्र  कांग्रेस कडेच वळलेला दिसून येतो. 

        येणाऱ्या काळात  अशोकराव व प्रतापवराव कोणतीही खेळी केली तरी मतदारांच्या मनात मात्र वसंत दिसत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post