प्रतिनिधी / माली पाटील
∆ लोकसभा निवडणूक जाहीर झाली प्रचार ही रंगात येण्यास सुरुवात झाली. अशातच भारत राष्ट्र समिती या निवडणुकीत राहणार नसल्याने या पक्षात वावर असलेले भोकर विधानसभेचे नेते तथा बहुजनांचे कैवारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते लोकनेते नागनाथ घिसेवाड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊन पक्षाला आधार द्यावा असी इच्छा भोकर विधानसभेती ल घिसेवाड प्रेमी नागरिकांनी व्यक्त केली.
भारत राष्ट्र समिती (बि.आर.एस )हा तेलंगानातील पक्ष या पक्षाचे सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी बि.आर.एस पक्ष महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढविणार म्हणत राज्यात दौरे केले.मेळावे घेतले आणि हवा करुन सोडले.नविन पक्ष,सगळंच दक्ष असी परिस्थिती होती.अन राज्यातील अनेक वंचित राजकीय नेते, कार्यकर्ते या पक्षात धडाधड प्रवेश केले.पण मध्यंतरी तेलंगाना विधानसभेची निवडणूक लागली यात बिआरएस पक्ष सत्तेतून पायउतार झाला.यामुळे या पक्षाची मानसिकता लयाला गेली.आता तर दारू घोटाळा प्रकरणी के.सी.आर यांची मुलगी के.कविता हिला अटक झाली व अनेक माजी आमदार,माजी मंत्री हे काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत.त्यामुळे बिआरएस पक्षाचे गृह उलटे फिरत असल्याने व अनेक विषयी विवंचनेत केसीआर असल्याने महाराष्ट्रातील कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचे समजते.त्यामुळे भोकर विधानसभा सभेतील नेते ज्यांना जिल्ह्यातील निवडणुकीची खडानखडा माहिती असलेले नागनाथ घिसेवाड यांनी राष्ट्रीय प्रवाहातील काँग्रेस पक्षाची कास धरावी अन् अडचणीत असलेल्या पक्षाला धीर देण्यासाठी या पक्षात यावे अशी भाबडी आशा विधानसभेतील बहुजन वर्ग व घिसेवाड प्रेमी यांनी व्यक्त करत आहेत.त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी सुद्धा अगर काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करायची असेल तर लोकनेते नागनाथ घिसेवाड यांच्याशी संपर्क साधावा जेणेकरून काँग्रेस पक्षाची ताकद वाढेल.असी भावना अनेक मतदारांची आहे.बघु या काय होते ते.
प्रा.यशपाल भिंगे लवकरच काँग्रेस मध्ये
सध्या स्थितीत भारत राष्ट्र समिती पक्षाची दुरावस्था पहाता तो पक्ष महाराष्ट्र राज्यात निवडणूक लढण्याची शक्यताच नाही, त्यामुळे बि आर एस पक्षात गेलेले व मागील लोकसभा निवडणुकीत ज्यांच्यामुळे माजी मुख्यमंत्र्याला पराभवाचा सामना करावा लागला ते अभ्यासु व्यक्तीमत्व असलेले प्रा.यशपाल भिंगे यांचा लवकरच काँग्रेस पक्षात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे समजते.प्रा.यशपाल भिंगे हे धनगर समाजाचे असुन यांच संघटन मजबूत आहे.त्या मुळें त्यांचा लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांस मोठा फायदा होणार आहे.एवढ मात्र नक्की!