प्रतिनिधी / माली पाटील
∆ मौजे किनी येथे श्री हनुमान मंदिर व महादेव मंदिर सहित मुर्तीची प्रतिष्ठापना व कळशारोहन कार्यक्रम प.पु.तपस्वी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज पिंपळगाव यांच्या शुभहस्ते राम प्रहात जय श्रीराम, बजरंग बली की जय,हरहर महादेवच्या निनादात कार्यक्रम सोहळा संपन्न असुन या सोबत अखंड हरिनाम सप्ताह व रामकथा पारायण सोहळा संपन्न होणार आहे.
भोकर तालुक्यातील मौजे किनी येथील हनुमान व महादेव मंदिर अत्यंत जिर्ण झाले व मंदिर खचल्याने येथील गावकऱ्यांनी संपूर्ण मंदिर बांधण्याचे ठरविले. त्या प्रमाणे जवळपास एक कोटी रुपय खर्च करून मंदिर बांधकाम केले.व मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिर कळशारोहन दि. १५ एप्रिल रोजी ठरविले असून सोमवार रोजी राम प्रहार वेळ ६ वाजुन ९ मिनिटांनी श्री बजरंग बली व देवाचे देव महादेव यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना स्थापन प.पु. बालयोगी व्यंकटस्वामी महाराज पिंपळगाव यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे.या भव्यदिव्य अशा कार्यक्रमांस पंच क्रोसीतील भक्त व माहेर घरच्या लेकिनी मोठ्या प्रमाणावर हजर राहुन या मंगल दिनाच्या सोहळ्याचे आनंद घेतला.
समस्त गावकरी मंडळी व महिला ही मोठ्या भक्तिभावाने या सोहळ्याचा आनंद लुटला. यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू करण्यात आले. तसेच या प्राणप्रतिष्ठा व कळशारोहन कार्यक्रमा निमीत किनी येथे पहाटे काकडा आरती सकाळी ४ ते ६ व ६.३० ते ९ पारायण सकाळी १० ते १ पर्यंत गाथा भजन, दुपारी १ ते ४ रामकथा, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ, या,त्री ८:३० ते ११ किर्तन, रात्री १२ ते २ जागरण असे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या व्यतिरिक्त सात दिवसात किर्तनाचे भव्य कार्यक्रम आयोजित केले आहे.
यात दि.१६ रोजी ह.भ.प. माधव महाराज बोरगडीकर, दि.१७ रोजी ह भ प गणेश महाराज बेंद्रीकर, दि.१८ रोजी निळोबा महाराज हरवलकर, दि.१९ रोजी परमेश्वर महाराज शहापूरकर, दि.२० रोजी ह भ प चंद्रकांत महाराज उस्मान नगरकर, दि.२१ रोजी ह. भ. प. सूर्यकांत महाराज होळकर, दि.२२ रोजी ह. भ. प. श्याम सुंदर महाराज आष्टीकर आणि दि. २३ रोजी कानोपात्रा बाई बामणीकर यांचे काल्याचे किर्तन होऊन समाप्ती होणार आहे.
तरी या पंच क्रोसीतील भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी कडुन करण्यात आले आहे.