प्रतिनिधी / माली पाटील
∆ भोकर येथील तहसील कार्यालयातील अव्वल कारकून म्हणून कार्यरत असलेले जि.आर.आडबलवार हे सेवा निवृत्त झाले असल्याने भोकर तालुका दिव्यांग सेनेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
भोकर येथील तहसील कार्यालयात अव्वल कारकून म्हणून जि.आर.आडबलवार हे गत दोन ते तीन वर्षा पासून येथे कार्यरत आहेत.ते तहसील कार्यालयातील अनेक विभाग सांभाळले आहेत.सध्या ते संजय गांधी निराधार विभागात अव्वल कारकून म्हणून काम करत होते.ते खर्या निराधार,अपंग लोकांना न्याय देत असे. दि. ३० एप्रिल २०२४ रोजी सेवा निवृत्त झाले आहेत. तेंव्हा दिव्यांग सेनेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक सुभाष नाईक किनीकर, दिव्यांग सेना तालुका अध्यक्ष विठ्ठलराव देवड,राॅका तालुका उपाध्यक्ष प्रकाश बोंदीरवाड, उपाध्यक्ष दिगंबर चव्हाण, सचिव बंडु भालेराव आदी उपस्थित होते.