भोकर-हिमायतनगर रस्त्यावर उभ्या असलेल्या दोघांना मोटार सायकलने उडविले दोन ठार



              प्रतिनिधी / माली पाटील 

भोकर- भोकर ते हिमायतनगर या रस्त्यावरील मौजे टाकराळा येथील फाट्यावर भोकर हुन येणाऱ्या मोटारसायकलने रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या दोघांना उडविले यात एक जण जागीच ठार झाला तर दुसरा मुलगा जख्मी झाला पण त्यास दवाखान्यात नेत असताना रस्त्यातच मरण पावल्याची घटना घडली आहे.

भोकर येथील वडार गल्लीत राहणारे खाजा मियाॅ हसन सहाब पठाण रिठ्ठेकर वय ६२ वर्ष व सलमान अमजद वय ९ वर्ष हे दोघे सोनारी येथे पाहुण्याच्या येथे कंदोरी कार्यक्रमासाठी गेले होते, कंदोरी कार्यक्रम आटोपून ते परत भोकर कडे ऑटोमध्ये बसुन येत असताना टाकराळा फाटा येथे ऑटो चालकाने ऑटो गरम झाला म्हणून तो रोडच्या कडेला थांबविला. खाजामिया हसन सहाब व सलमान अमजद हे ऑटोतुन उतरून रोडच्या कडेला थांबले होते.तेवढ्यात  भोकरून हिमायतनगर कडे भरघाव वेगात येणाऱ्या  मोटरसायकल स्वाराने उभे असलेल्या या दोघांना उडविले.यात खाजामिया हसन साब हे जागेवरच ठार झाले तर सलमान अमजद वय हा मुलगा गंभीर जख्मी  झाला असता त्यास  भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी नांदेड कडे जात असताना सलमानचा रस्त्यातच मृत्यू झाला. सलमान यास वडील नसुन आई व पाच बहिणी आहेत.मयत हे भोकर येथील वडार गल्लीत राहत होते.त्यांच्या अपघाती मृत्यू मुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.आजच दुपारी दोन वाजता मुस्लिम येथील शमशान भुमीत अंत्यविधी करण्यात आला.

तहसिलचे सिध्दार्थ सोनसळे यांची धडपड. 

--------------------------------------------------------

सलमानच्या अपघाताची आईला समजताच आईने आपल्या शेजारी राहणारे भोकर तहसीलचे कारकुन सिद्धार्थ सोनसळे यांना मोबाईल  करून माझ्या मुलाचा अपघात झाला. त्या मुलाला आणि वडिलाला घेऊन या अशी विनंती केली अन् लगेच सिद्धार्थ सोनसळे यांनी आपले वाहन घेऊन टाकराळा फाट्याजवळ गेले. पण येथे बघ्यापैकी कोणीच या जखमींना हात लावून उचलत नव्हते. पण सोनसळे यांनी वेळ न दवडता त्यांनी आपल्या कार मध्ये जख्मी सलमानला घेतले व भोकर ग्रामीण रुग्णालयात  दाखल केले.पण परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरानी मुलाला पुढील उपचारासाठी नांदेडला नेत असतानाच मुलाने प्राण सोडले. मुलगा वाचावा म्हणून धडपड करणार्या सिध्दार्थ सोनसळे च्या प्रयत्नास यश आले नाही.तरी शेजार धर्म निभावणर्या सोनसळेचे करावे तेवढे कौतुकच !

_______________________________________


Post a Comment

Previous Post Next Post