हनुमान नगर भागातील डंपिंग ग्राउंड इतरत्र स्थलांतरित करा-शहर शिवसेना

                 प्रतिनिधी / माली पाटील 

∆ भोकर नगर परिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरातील हनुमान नगर भागातील मारुती मंदिराजवळ   घनकचरा डेपो टाकत असल्याने या वस्तीत दुर्गंधी व  माशा आणि डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने लोकांच्या जिवणासी न खेळता सदरील घन कचरा डेपो इतरत्र स्थलांतरित करून न्याय द्यावा अन्यथा उपोशन करण्याचा इशारा शिवसेना शहराच्या वतीने नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आले.

     शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोकर नगरपरिषद कार्यालय अंतर्गत हनुमान नगर येथील मारुती मंदिराजवळ  घनकचरा टाकण्यात येतो. येथे वस्ती असताना सुद्धा मुद्दामहून घनकचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे हनुमान नगर येथील कष्टकरी, कामगार, वडार समाज व इतर मागासवर्गीय समाजाची लोक वस्तीत मोठ्या प्रमाणावर आहेत. नगरपरिषदेने येथे डम्पिंग ग्राउंड केले. आणि येथे शहरातील घनकचरा मोठ्या प्रमाणावर  टाकण्यात येतो.


 त्यामुळे या परिसरात दुर्गंधी व डासांचा आणि माशांचा मोठ्या प्रमाणावर त्रास वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या अति दूषित वातावरणात माशांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. हनुमान नगरी मधील प्रत्येक घरात लहान बालके, तरुण, वृद्ध, महिला सतत कोणी ना कोणी तरी आजारी पडत आहे. यात साथीचे रोग, संडास, जुलाब डेंगू व मलेरिया अशा रोगांनी  पछाडल्या जात आहे. परंतु नगरपरिषद प्रशासन याकडे सक्षम दुर्लक्ष करीत आहे. त्यानंतर ही वारंवार निवेदने, अर्ज देऊनही डम्पिंग ग्राउंड इतरत्र हलविले नाही, ना त्यावर उपाययोजना केले नाही. आणि एकीकडे भारत स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ भारत योजना राबविली जात आहे.आणि इकडे वस्तीच्या शेजारी  घनकचरा डेपो टाकून, या स्वच्छ भारत योजनेचे तीन तेरा वाजवीत अस्वच्छता निर्माण केले जात आहे.

 त्यामुळे नफा प्रशासनाने वस्तीतील नागरिकांच्या आरोग्याची न खेळता हा घनकचरा डेपो इतरत्र हलवून या परिसरातील लोकांना न्यायिक दिलासा द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषणाला बसण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवेदनाद्वारे नपला देण्यात आला. या निवेदनावर शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार, उपशहर प्रमुख दीपक मेटकर, माजी तालुकाप्रमुख माधव पा. वडगावकर, शहर संघटक राहुल कोंडलवार यांच्या सह्या आहेत.  


Post a Comment

Previous Post Next Post