प्रतिनिधी / माली पाटील
∆ भोकर तालुक्यातील मौजे रेणापुर येथे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वीज शेतात बांधलेल्या गायीवर कोसळली अन् यात गाय मृत पावल्याची घटना घडली आहे.दि.१२ मे रोज रविवारी दुपारी ३ च्या सुमारास वादळी वार्यासह अवकाळी पाऊस बरसला.यातच विजेचा कडकडाट होऊन मौजे रेणापुर येथील शेतकरी आबाजी शिवाजी कोळेकर यांच्या शेतात बांधलेल्या गायीवर वीज कोसळली अन् गाय जागीच मरण पावली आहे.