प्रतिनिधी / माली पाटील
∆ भोकर शहरात नगर परिषदेचा शहर स्वच्छतेकडे मोठे दुर्लक्ष होत असल्याने शहरातील कृष्णानगर भागात गत दोन महिन्यांपासून नाल्यांची सफाई न केल्याने दुर्गंधी पसरली आहे.यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
भोकर येथे नगर परिषद कार्यान्वित असुन सध्या या नपवर प्रशासकाचे राज्य आहे. जेणे करून यांना सर्व सामान्य लोकांच्या प्रश्नांवर लक्षच नसते.सरकार ही लोकशाहीस मारक असुच भुमिका घेत निवडणूकाच घेत नाही.यामुळे येथे कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही.या ठिकाणी प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी हे काम पहातात तर प्रशासक मुख्याधिकारी म्हणून मुदखेडचे नायब तहसीलदार जगताप हे आहेत. पण सध्याचा त्यांचा बिजी शेड्युल पहाता त्यांचं या नप च्या कारभाराकडे कसलेच लक्ष नाही.त्यात अशा कारभाराने कर्मचारी ही आपली पोळी भाजुन घेत असल्याचे दिसते.जरी येथे प्रशासकीय राज्य असले तरी या ठिकाणी काही पदाधिकारी आपलंच राज्य नपवर असल्यासारखे वागताना दिसतात.असो पण शहरातील कृष्णानगर भागात गेल्या दोन महिन्यां पासून नाल्याची साफ सफाई न केल्याने त्या नाल्यांचा वास अर्थात दुर्गंधी पसरली आहे.
काही नागरीक स्व:ता हातात फावड घेऊन नाल्या काढताना दिसत आहे.या संबंधी नपात तक्रार केली असता याला सांगा,त्याला सांगा असे उडवाउडवीचे उत्तर मिळते.त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.त्यामुळे नप प्रशासनाने नागरीकांच्या आरोग्य जीवनातही खेळ न करता त्वरित नाल्या काढण्याची सोय करावी असी मागणी कृष्णानगरवाशी यानी केली आहे.
सीसी रस्ता करण्यास टाळाटाळ
----------------------------------------
कृष्णा नगर मध्ये जागृत तेल काळा मारोती मंदिर आहे.या ठिकाणी असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या काळा मारुतीच्या दर्शनासाठी येतात.पण येथे कच्चा रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात धुळ होत असल्याने या मंदिरासमोरील कच्चा रस्ता हा सिमेंट काँक्रिट करुन द्यावा असी मागणी शिवसेनेचे जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर यांनी नप पदाधिकारी यांच्या कडे गत तीन चार वर्षांपूर्वी केली होती.त्यावेळी हा रस्ता करुन देतो म्हणून माजी नगराध्यक्षाने आश्वासन दिले.त्यानंतर या भागाचे आमदार व सध्याचे खासदार अशोकराव चव्हाण यांना ही निवेदन दिले.कोठे माशी शिंकली कोण जाणे पण अद्याप रस्ताचा पत्ता नाही.अन जिथे घर नाहीत तिथे रस्ते तयार केले.याच वार्डातील अनेक मुस्लिम वर्ग असलेल्या ठिकाणी सि.सी रस्ते केले. पण हिंदूचे श्रद्धास्थान असलेल्या कृष्णा नगरमधील मारोती मंदिरासमोर रस्ता वारंवार सांगुन ही केला नाही.व करण्यास अजुन ही तसली दाखवत नाहीत.त्यामुळे भोकर नगर परिषदेने येथील गल्लीतील रस्ते करावे अन्यथा वेगळा पर्याय निवडावा लागेल असा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उप संघटक तथा पत्रकार संघाचे सचिव सुभाष नाईक किनीकर यांनी दिला आहे.