शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा
प्रतिनिधी /माली पाटील
∆ महाराष्ट्र राज्यातील विविध विभागांत दि.७ मे ते ११ मे पर्यंतच्या दरम्यान अतिशय जोरात वादळी,वारासह आणि गारा सहीत अवकाळी मुसळधार म्हणजे जमीनीतुन वाहुन निघणार एवढा मोठा पाऊस होण्या चार अंदाज वा शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव बँक यांनी वर्तवीत शेतकऱ्यांनी हळद,कांदा या पिकाला जपावे असा सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सध्या होत असलेला उन्हाच्या तडाख्याने लोक हैराण असुन यातच अवकाळी पावसाचा इशारा यामुळे शेतकरी मेटाकुटीला येत आहे.सध्या हळद पिकाची काढणी व शिजवणे चालु आहे.यातच हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी अंदाज व्यक्त करताना सांगितले की, राज्यात ६ मे पर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.व त्यानंतर ७ मे ते ११ मे पर्यंतच्या दरम्यान राज्यात वादळी वारे,गडगडात,विजेचा कडकडाटात आणि गारांसहीत मोठा पाऊस पडुन शेतातुन पाणी वाहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
यात पुर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र,व कोकणात मेघ गर्जनेसह वादळी वारा,गारा व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
७ मे पासून पुढील पाच दिवस मराठवाड्यात मुसळधार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा,हळद, कापूस पिकाची काढणी ६ मे पर्यंत करुण घ्यावी व योग्य प्रकारे झाकून ठेवावे जेणे करून टळेल असा सतर्कतेचा इशारा पंजाब डख यांनी दिला आहे.हा पाऊस उन्हाळ्यात आतापर्यंत झालेल्या पावसापेक्षा जास्त अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.