बोगस बिलातुन आर्थिक लाभ घेणाऱ्या रिठ्ठा ग्राम पंचायत सरपंचाला अपात्र करण्याची मागणी


प्रतिनिधी / माली पाटील 

  ∆  भोकर तालुक्यातील मौजे रिठ्ठा येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी संगमत करून  सामाजिक कार्यकर्ते रमण नागोराव शिंदे यांनी स्वतः खर्च करून दिलेल्या बोअरवेल व इलेक्ट्रॉनिक मोटरचे पंधराव्या वित आयोग निधीतील १ लाख ४९ हजार ३४१ रुपयांचे अंदाजपत्रक सादर करुन वरील रक्कम खर्च न करता त्यांचा आर्थिक लाभ करुन घेतल्याने सरपंच संगीता परसराम करंडेकर  संगीता परसराम करंडेकर यांना अपात्र घोषित करण्याची मागणी रिठ्ठा येथील सामाजिक कार्यकर्ते  रमण  शिंदे  यांनी जिल्हाधिकारी,नांदेड यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

  मौजे रिठ्ठा  येथील सामाजिक कार्यकर्ते रमण नागोराव शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मौजे रिठ्ठा येथील प्रभाग क्र तीन मध्ये सिरमवाड यांच्या घरासमोर भवानी मंदिर रोड या ठिकाणी डिसेंबर २०२२ साली स्वतःच्या खर्चातून बोरवेल खोदून दिला. त्याचप्रमाणे सदरील बोरवेल पाणी पुरवठा करण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार बसवून दिली व गावातील जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली. यात सरपंच संगीता परसराम करंडेकर  व  एम. एम. गायकवलाड ग्रामसेवक रिठ्ठा यांनी संगणमत करून  सदरील बोरवेलचे व इलेक्ट्रिकल मोटरचे पंधराव्या वित्त आयोगातील निधीतील एक लाख ४९ हजार ३४१ रुपयाचे इलेक्ट्रिकल मोटारचे अंदाजपत्रक  सादर करून वरील रक्कम खर्च न करता आर्थिक लाभ करून  घेतल्याची माहिती माहिती अधिकारातून वारंवार अर्ज करून सुद्धा दिली नाही. शेवटी ती नोटीसी दिल्यानंतर तक्रारदार रमण नागोराव शिंदे यांना माहिती देण्यात आली. त्या माहितीत असे निदर्शनात आले की, रमण शिंदे यांनी स्वखर्चाने प्रभाग क्रमांक तीन मध्ये सिरमवाड यांच्या घरासमोर  भवानी मंदिर रोड येथे स्वखर्चाने बोर मारून त्यामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी इलेक्ट्रिकल मोटर बसवून दिली. परंतु सरपंच ग्रामसेवक यांनी संगणमत करून आम्हीच कामासाठी पैसे खर्च केले म्हणत बोगस बिले सादर करून आपला आर्थिक लाभ करून घेतला असल्याचे दर्शनास आल्यानंतर रमण नागोराव शिंदे यांनी  जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५८ कलम १४ (ग) नुसार सरपंच संगीता परसराम करंडेकर यांना अपात्र घोषित करण्याची मागणी तक्राराद्वारे केली आहे.

__________________________________________

तक्रारदार रमण शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना तक्रार दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय  यांच्या कडुन तहसील कार्यालय भोकर मार्फत  गट विकास अधिकारी पंचायत समिती, भोकर यांना संबंधित ग्रामपंचायत च्या मुळ अभिलेखाची मुळ पडताळणी करून आपला स्वंयस्पष्ट अहवाल अभिप्रानिसी पंधरा दिवसांच्या आत कार्यालयाकडे सादर करावा असे आदेश दिले. हि माहिती सरपंच यांना कळाल्यानंतर त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने दि.११ मे रोजी बोअरमधील मोटार काढून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

__________________________________________



Post a Comment

Previous Post Next Post