किनी येथील कै.हनमंत अमृतराव शिंदे थेरबनकर यांचा दि.२७ एप्रिल रोजी सायंकाळी मोटारसायकलचा अपघात होऊन तब्बल ४२ दिवसांनंतर ते मरण पावले. कै. हनमंत शिंदे हे आपले उदार्निवाह करण्यासाठी किनी येथे ट्रक्टरवर चालक म्हणून रेड्डीकडे कामाला होते.घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्या कुटुंबावर संकट कोसळले आहे.सदर हनमंत शिंदे यांच्या मृत्यू व कुटुंबातील हालाखीची परिस्थिती असल्याचे बिआर एस नेते तथा भावी आमदार नागनाथ घिसेवाड यांना समजताच त्यांनी दि.११ जुन रोजी किनी येथे जाऊन त्या कुटुंबाची भेट घेतली. आणि त्या शिंदे कुटुंबाला आर्थिक मदत करत कै.हनमंत शिंदे यांच्या दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.यामुळे शिंदे कुटुंबाचा थोडा दिलासा मिळाला आहे.यावेळी जेष्ठ समाजभुषण नागोराव शेंडगे बापू, शिवसेना उबाठा जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर,युवा नेते रविंद्ररेड्डी बोंतलवाड,व्यंकटी कुम्मरवाड श्रीनिवासरेड्डी चिंतलपेल्ली, बालुरेड्डी करेमगार, दत्तप्रसाद नाईक, पत्रकार करखेलीकर, पत्रकार अनिल डोईफोडे, पत्रकार दत्ता बोईनवाड, पत्रकार पोलादवार, बालाजी काळे, राष्ट्रवादी ता उपाध्यक्ष प्रकाश बोंदीरवाड,मामीडवाड मुत्यमरेड्डी चेअरमन दत्तात्रय तोकलवाड, कैलास पवार, दिलीप पवार, गंगाधर तुराटीकर, आटाळकर आदी उपस्थित होते.
आर्थिक मदत करत बिआरएस नेते नागनाथ घिसेवाड यांनी घेतली मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
byलोकभावना न्युज
•
0