भोकर तालुक्यातील कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्यांची लय लुक; कारवाची मागणी


            प्रतिनिधी/ माली पाटील 

भोकर  तालुक्यातील शेतकरी सध्या खरीप पिकाच्या पेरणीसाठी बी-बियाणांची खरेदी करीत आहे परंतु बाजारात बी-बियाणे खरेदी करताना कृषी दुकानदाराकडून दुप्पट भावाने बी-बियाणे व खते शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जात असल्याने ऐन पेरणीच्या मोसमात शेतकरी नागवल्या जात आहेत.तेव्हा चढ्या भावाने बी-बीयाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांची चौकशी करुन त्वरित कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना मूळ किमतीत बी-बियाणे व खते उपलब्ध करून द्यावेत अन्यथा लोकशाही मार्गाने तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन छेडण्याचा इशारा बीआरएस चे नेते नागनाथराव घिस्सेवाड व तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिनांक ११ जून रोजी तहसीलदारांना एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

   शेतकरी उन्हाळ्यात घाम गाळून शेतीची मशागत करून जमीन पेरण्यायोग्य करून ठेवली आहे.आता पावसाला सुरुवात झाली असल्याने काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी बी-बियाण्याच्या खरेदीसाठी पैशाची जमवाजमव करत आहेत. बँका वेळेवर पिककर्ज देत नसल्याने सावकाराच्या दारात जाऊन म्हणेल त्या व्याजदरात पैसे जमा करून शेतकरी राजा बाजारातून बी बियाणे खरेदी करण्यासाठी जात आहेत.मात्र कृषी दुकानदार या संधीचा फायदा उठवून कपाशीचे बियाणे व खते चढ्या दराने शेतकऱ्याच्या माथी मारून त्यांची आर्थिक लुट करीत आहेत.शासनाच्या धोरणाप्रमाणे कपाशीच्या कोणत्याही बियाणांची किंमत ८६५ रुपये आहे परंतु बाजारात रासी ६५९-बियाणे १५००/यु.एस.बियाणे १५००/,संकेत ११११ बियाणे २००० ते २५००रुपये,सुपर काॅट बियाणे १२००/,बहादूर बियाणे १४००रुपये प्रमाणे विकल्या जात आहे.त्यामुळे दिवसा ढवळ्या शेतकरी कृषी दुकानदाराकडून नागवल्या जात आहेत. तरी मेहरबान साहेबांनी याची गंभीर दखल घेऊन लूट करणाऱ्या दुकानदारावर त्वरित योग्य ती कारवाई करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

   या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकारी भोकर यांनाही देण्यात आल्या आहेत.या निवेदनावर नागनाथ घिस्सेवाड,नागोराव शेंडगे, शिवसेनेचे जिल्हा संघटक सुभाषराव नाईक, रमेश महागावकर,प्रकाशराव बोंदिरवाड,विठ्ठलराव देवड,साईनाथ याटेवाड,बंडु भालेराव,संजय टिकेकर,यशवंत किसवे,योगेश अक्कलवाड,दिगंबर बोंदिरवाड,  शिवाजी हुबेवाड,गीतेश बोटलेवाड आदिसह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post