केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे व अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या हस्ते लोकनेते नागनाथ घिसेवाड व शेंडगे बापू यांना कोल्हापूर येथे पुरस्कार प्रदान


                 प्रतिनिधी/ माली पाटील 

राज्यातील अनेक जिल्ह्यांत विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांचा सन्मान व्हावा म्हणून कोल्हापूर येथील दैनिक रोखठोकच्या दुसऱ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत समुहाने यंदाचा महाराष्ट्र भूषण  चा पुरस्कार भोकर तालुक्याचे सर्व सामान्य जनतेचे लोकनेते नागनाथ घिसेवाड नागनाथराव घिसेवाड यांना तर समाज सेवेची धुरा वाहणाऱ्या बहूजन नेते नागोराव शेंडगे बापू  यांना समाज रत्न पुरस्कार हजारो लोकांच्या उपस्थित आणि टाळ्यांच्या कडकडाटात प्रदान करत यांचा सन्मान करण्यात आला.


 नांदेड जिल्हात सर्व सामान्य गोरगरीब लोकांचे काम करत राजकीय क्षेत्रात निव्वळ राजकारण न करता जनतेच्या विविध समस्याचे निवारण करत भोकर तालुक्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून भोकर येथे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षणाची सोय केली.त्याच्या अशा अनेक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व व कामगिरी पाहुन त्यांना २०२४ चा"महाराष्ट्र भूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भोकर तालुक्यातील शेतकऱ्याचे प्रश्न, निराधारचे प्रश्न, दिन दलितांचे प्रश्न व विविध आंदोलने आदी कर्तृत्वामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन ओबीसी नेते नागोराव शेंडगे बापू यांना दैनिक रोखठोक वृत्तपत्र समूहाच्या वतीने यावर्षीचा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.दि. १४ जुलै  रोजी शाहु नगरीच्या कोल्हापुर येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज सभागृहामध्ये केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे व  मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर, दैनिक लोकमतचे संपादक सुरेश माडकर, कार्यकारी संपादक डॉक्टर सुरेश राठोड,निवासी संपादक सुशील अग्रवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या पुरस्काराच्या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार तथा आंबेडकर चळवळीचे नेते एल.ए. हिरे,मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष तथा देशोन्नतीचे प्रतिनिधी बि.आर.पांचाळ, शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा रोखठोक भोकर प्रतिनिधी सुभाष नाईक किनीकर (माली पाटील), पत्रकार दत्ताभाऊ बोईनवाड आदी उपस्थित होते.या अत्यंत प्रतिष्ठेचा व महत्त्वाच्या पुरस्कारामुळे भोकर तालुक्यातील विविध स्तरातून नेते नागनाथ घिसेवाड, नागोराव शेंडगे बापू यांचे अभिनंदन होत आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post