प्रतिनिधी/ माली पाटील
∆ बार बार ये दिन आये, जिओ तुम हजारो साल, हॅपी बर्थडे टु यु ! म्हणत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने दिव्यांग सेनेचे अध्यक्ष विठ्ठल देवड यांचा वाढदिवस शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला.
शिवसेना प्रणित दिव्यांग सेना तालुका प्रमुख विठ्ठल देवड यांचा जन्म दिवस शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उप-संघटक सुभाष नाईक किनीकर यांनी भोकर रुरल फार्मस प्रोडुसर कं,ली कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी विठ्ठल देवड व पत्रकार अरुण डोईफोडे या दोघांचा जन्मदिवस शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या जन्म दिवस कार्यक्रमास ओबीसी नेते नागोराव शेंडगे बापू,माजी तालुकाप्रमुख प्रदीप दौलतदार, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष प्रकाश बोंदीरवाड,युवा सेनेच्या गणेश आरलवाड, पत्रकार उत्तम कसबे,प्रोडुसर कंपनीचे माधव सलगरे, प्रमोद चौदंते आदी उपस्थित होते.