प्रतिनिधी / माली पाटील
∆ भोकर येथील शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रदीप पाटील दौलतदार यांची महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ नांदेड उत्तरच्या जिल्हा मुख्य संघटक पदी निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ या सामाजिक, वैचारिक चळवळीसाठी वेळ ,श्रम, बुद्धी,कौशल्य व सेवा भावनेने संघटनेत सातत्याने करत आलात.तसेच आपले सामाजिक क्षेत्रातील मोलाचे योगदान पहाता आपण केलेल्या कार्याची दखल घेत आपल्याला हेच कार्य व्यापक रितीने करण्याची संधी तसेच आपल्या माध्यमातून संघटना अधिकाधिक बळकट व्हावे.यासाठी आपली नांदेड जिल्हा उत्तर विभागाच्या मुख्य संघटक पदी नियुक्ती करण्यात येत आहे.प्रदिप दौलतदार यांच्या निवडीचे संतोष कोटुरवाड,दत्ता कानकाटे, लक्ष्मण पाटील शेंडगे,अतुल पवार,नारायण हरकरे, अनिल जाधव, सुनील जाधव यांनी अभिनंदन केले आहे.यावेळी दौलतदार यांनी प्रदेशाध्यक्ष गिरीष जाधव,राज्य सचिव व्यंकटराव जाधव, कार्याध्यक्ष डॉ.राजेंद्र वानखेडे यांचे आभार मानले.