भोकरहुन नांदेड कडे जाणारी खासगी बस वाकद शिवारात उलटल्याने प्रवासी किरकोळ जख्मी


                     प्रतिनिधी/ माली पाटील 

∆ भोकर -नांदेड व भोकर- म्हैसाळ  महामार्गावर प्रवासी वाहतूक बेजबाबदार पुणे चालवत असल्याने प्रवाशांना नाहक बळी पडावे लागत आहे.असेच भोकर हुन नांदेड कडे प्रवासी वाहतूक करणारी एक खाजगी बस  वाकद शिवारात उलटल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

 भोकर- नांदेड या मार्गावर मोठ्या प्रमाणात खाजगी वाहतूक सुरू आहे.मॅजीक,ट्राव्हलस,काळी-पिवळी अशा अनेक वाहतूक गाड्या दररोज ये-जा करतात. दि.२४ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक खाजगी बस प्रवाशी घेऊन नांदेड कडे प्रस्थ झाली.सांयकाळची गाडी असल्याने अनेक प्रवासी बसमध्ये होते.  भोकर वरून बुधवारी सायंकाळी एम एच १२ केयु ०२४४ क्रमांकाची एक खाजगी बस वाकत शिवारात आली असता चालक शेख सलीम याचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला खाली जाऊन  एका खड्ड्यात उलटली. यावेळी प्रवासी गोंधळुन जाऊन चिरकु लागले. परंतु सुदैवाने या अपघातात कोणतीही हाणी झाली नाही. मात्र बसमधील असलेल्या अनेक प्रवाशांना मुका मार लागुन जखमी झाले आहेत. या जखमींना भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टरानी उपचार केले असल्यानचे समजते. अशा मनमानी प्रवाशी वाहतुकीमुळे लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.याकडे शासन गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.



Post a Comment

Previous Post Next Post