प्रतिनिधी / माली पाटील
∆ भोकर शहराच्या वळन रस्त्यावरील उमरी रोडवर असलेल्या कैलास टेकडी जवळ असंख्य मेंढ्या चरत-चरत जाऊन यातील ३० शेळ्या-मेंढ्या औषध फवारणी केलेला चारा खाऊन जवळच साचलेल्या एका डोहातील पाणी पिल्याने विषबाधा होऊन २२ मेंढ्यांचा मृत्यू झाला तर ८ मेंढ्या उपचारादरम्यान बचावल्या आहेत. सदर घटना दि.८ जुलै रोजी दुपारी ५:३० वाजता च्या दरम्यान घडली.
भोकर शहराच्या आसपास गुजरात राज्यातील मींदियाडा गाव अंजाड तालुका येथील मेघा देवा रबारी हे मेंढपाळ बांधव बर्याच दिवसापासून मेंढ्या घेऊन आहेत.ते दि. ८ जुलै रोजी भोकर शहरा जवळील कैलास टेकडी या परिसरात मेंढ्या चारवत होते.मेंढ्या चरत-चरत औषधी फवारणी केलेल्या चारा खाऊन जवळच असलेल्या एका डोहातील पाणी पिले आणि रस्ता ओलांडून हेलिपॅड घ्या खालच्या रानात जाताच जवळपास ३० मेंढ्या चक्र येऊन खाली कोसळल्या अन् एक-एक वेळी व मेंढी तडफढुण मरण पावत होत्या.तेव्हा ते काही भोकरचे मंडळी पोहचली आणि पशुवैद्यकीय अधिकार्यांना फोन करून बोलावून घेतले असता डॉ. विजय चव्हाण, डॉ.सुनील जाधव व त्यांच्या टिमणे तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन त्यांनी लगेच ३० मेंढ्या वर उपचार सुरू केल्याने त्यातील ८ मेंढ्या वाचवण्या यश आले आहे. पशुसंवर्धन विभागाचे डॉ.विजय चव्हाण,डॉ.सुनील जाधव व त्यांच्या सर्व टीमने मेंढ्या वाचवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु २२ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तहसीलदार भोकर यांना घटनेची माहिती देण्यात आली.पोलीस स्टेशन भोकर येथेही अर्ज करण्यात आला. घटनेची माहिती कळताच भोकर विधानसभा सभेचे बहुजन नेते नागनाथ घिसेवाड, ओबीसी नेते नागोराव शेंडगे बापू,भाजपचे प्रकाश मामा कोंडलवार, शिवसेनेचे जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाश बोंदीरवाड आदींनी घटनास्थळी भेट दिली. तलाठी जोशी, पोलीस उपनिरीक्षक यांच्या समक्ष डॉक्टरानी पंचनामा करून अश्वविच्छेदन करण्यात आले. भटकंती करणार्या मेंढपाळांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.